अमृत महोत्सवावर मनपाचा झाला 'इतका' खर्च

अमृत महोत्सवावर मनपाचा झाला 'इतका' खर्च

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविले होते. महापालिका मुख्यालयासह (Municipal Headquarter) सर्व विभागीय कार्यालय सुशोभिकरण (Departmental office beautification), विद्युत रोषणाई (Electric lighting), सेल्फी पॉईंट (Selfie point) यासाठी तब्बल १७ लाख रुपये ठेकेदाराला (Contractor) मनपाने मोजले आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी (दि.१४) स्थायी समितीची बैठक झाली.

त्यात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राजीव गांधी भवन (Rajiv Gandhi Bhavan), हुतात्मा स्मारक (Martyrs Memorial), शहीद स्मारक (Martyr's Memorial) यासह सुशोभिकरण करण्यात आले होते. त्यासाठी आलेल्या दहा लाख रुपयांचा खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच अमृत महोत्सवानिमित्त स्वाधिनी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

स्टेज, खुर्च्या, सेल्फि पाईंट उभारण्यात आला. त्यासाठी सहा लाख ४७ हजार रुपये खर्च आला. त्यास देखील मान्यता देण्यात आली. तसेच महापालिका मुख्यालय, विभागीय कार्यालये व उपकार्यालयातील संगणक साहित्य दुरुस्ती (Computer hardware repair) व देखभाल यासाठी तज्ञ संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील विविध चौकातील सिग्नलची एक वर्षाकरीता देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी २९ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच जाहिरात परवाना शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com