मनपाची पर्यावरण रक्षणासाठी विशेष मोहीम

दीडशे सायकलस्वारांद्वारे स्वच्छ हवेसाठी जनजागरण
मनपाची पर्यावरण रक्षणासाठी विशेष मोहीम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रीय स्वच्छ प्रकल्पांतर्गत शहर परिसरातील वायुप्रदूषणाचे हवा परिणाम व समस्या कमी करण्यासाठी टेरी या संस्थेच्या पुढाकाराने महापालिका( NMC), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ(MPCB ) व स्विस एजन्सी फॉर डेव्हलपमेंट अ‍ँ‍ड कार्पोरेशन ( Swiss Agency for Development and Corporation)यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली व पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित 17 शहरांमध्ये नाशिकचा समावेश असल्याची बाब समोर आली. टेरी या संस्थेच्या फक्त एकच पृथ्वी आणि समन्वय शाश्वत सुसंवादात्मक जीवन पद्धती आणि या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. सायकल रॅलीत दीडशे सायकलस्वारांनी सहभाग घेतला. शहरातील दहा किलोमीटरच्या मार्गावर सायकल चालवत स्वच्छ पर्यावरणाचा संदेश दिला. महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी गोल्फ क्लब मैदान शाश्वत जीवन ही जबाबदारी शहरांमध्ये कमी अंतर पार करण्यासाठी आपण सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले.

निरीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. तन्वीर अर्फिन म्हणाले, बदल करून कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वायुप्रदूषण रोखण्यासाठी आपल्याला शाश्वत कृतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. टेरीचे गरिमा कपूर यांनी शाश्वत जीवनशैली व्यक्तीचा किंवा समाजाचा पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधन आणि वैयक्तिक संसाधनांचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.डॉ.अंजू गोयल म्हणाल्या, वायूप्रदूषण हा एक पर्यावरणीय धोका आहे.

जो वर्तमान आणि भावी पिढ्यांवर परिणाम करतो. समस्येचा सामना करण्यासाठी सहयोगी कृती करण्याची आवश्यकता असल्याचे नमुद केले. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने यांनी प्रत्येकाने विजेवर चालणार्‍या वाहनांचा व सायकलचा जास्तीत-जास्त वापर करण्याचे आवाहन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com