मनपा अधिकारी-सेवक क्रिकेट सामना; आज विजेत्यांचा गौरव

मनपा अधिकारी-सेवक क्रिकेट सामना; आज विजेत्यांचा गौरव

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेचा 40 वा वर्धापन दिन ( 40th Anniversary of Nashik Municipal Corporation) आज सोमवारी (दि.7) साजरा होणार आहे. त्यानिमित्त आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर काल (दि. 6) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मनपा अधिकारी व सेवकांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, प्रभारी उपायुक्त नितीन नेर, नगर नियोजन विभागाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर, विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, मदन हरिश्चंद्र, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, गणेश मैंद, उपअभियंता रवींद्र बागुल, जयवंत राऊत, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, हुसेन पठाण, अनिल गायकवाड, सागर पीठे, विशाल घागरे, मोहित जगताप, संकेत शिवणकर, प्रवीण ठाकरे, भास्कर बहिरम, सचिन बोरसे, दत्ता क्षीरसागर, राजाराम जाधव, विशाल खोडे, हुसेन शेख आदींनी सहभाग घेतला होता. टॉस जिंकून एनएमसी सुपरकिंग संघाचे कर्णधार आवेश पलोड यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली.

10 षटकांत 5 बाद 80 धावा केल्या. जयवंत राऊत त्यांनी तडाखेबंद फलंदाजी करत 18 धावा केल्या. रवींद्र बागुल कर्णधार असलेल्या एनएमसी वॉरियर्स संघाने 6 बाद 78 धावा केल्या. संदेश शिंदे यांनी अष्टपैलू खेळी करत फलंदाजीसह गोलंदाजीत 3 बळी घेतले. बाऊंड्रीवर अवघड झेल घेतला. नितीन गायकवाड यांनीही उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन बळी घेतले. अटीतटीच्या या सामन्यात तीन धावांनी सुपरकिंग संघाने विजय मिळवला. आनंद भालेराव सामन्याचे पंच होते. विजयानंतर विजेत्या सुपरकिंग संघाने एकच जल्लोष केला. नगर नियोजन विभागातील समीर रकटे यांनी या सामन्याचे नियोजन केले होते.

आज सायंकाळी कार्यक्रम

सोमवारी कालिदास कलामंदिरात विजेत्या व उपविजेत्या संघाना ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी 7 नोव्हेंबरला मुख्यालय राजीव गांधी भवन येथे प्रशासन विभागात सकाळी सत्यनारायण पूजेचे आणि संध्याकाळी सात वाजता कालिदास कलामंदिरामध्ये सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मनपातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे. अधिकारी, कर्मचारी आपले कलागुण यावेळी सादर करतील. स्वतः आयुक्त देखील यावेळी गाणे सादर करणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहे. नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com