
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वतीने तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा ‘पुष्पोत्सव’ (flower festival) भरविण्यात येणार आहे. मनपाच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागामार्फत (Department of Parks and Trees Authority) त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे.
जानेवारी 2023 च्या शेवटच्या आठवड्यात पुष्पोत्सवाचे आयोजन करण्याचा महापालिकेचा विचार आहे. या पुष्पोत्सवसाठी सुमारे 30 लाख रुपये खर्च अपेक्षित असून बजेटमध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. 1993 पासून महापालिकेच्यावतीने राजीव गांधी भवनच्या (Rajiv Gandhi Bhavan) इमारतीत व बाहेरील उद्यानात पुष्पोत्सवाचे आयोजन केले जात होते. मात्र करोनामुळे (corona) पुष्प महोत्सव (flower festival) खंडित झाले होते ते आता पुन्हा होणार आहे.
या पुष्पोत्सवात पुष्परचना, पुष्परांगोळी, गुलाब राजा, गुलाब राणी, गुलाब राजकुमार-राजकुमारी यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबरच बंगलो गार्डन स्पर्धाही भरविली जाते. त्याला नाशिककरांचा भरपूर प्रतिसाद देखील दरवर्षी मिळत राहतो. पुष्पोत्सवात सुमारे २ हजाराहून अधिक फुले, झाडांचे प्रकार पाहायला मिळायचे.
बोन्साय (Bonsai), कॅक्टस (cactus), इनडोअर-आऊटडोअर प्लॅन्टिंग (Indoor-outdoor planting) ह्यांचे कमालीचे आकर्षण असायचे. याशिवाय, या महोत्सवात बागकामासाठी लागणारे साहित्य, अवजारेही उपलब्ध करून द्यायची.