दहावी, बारावी परीक्षा पूर्वी होणार मनपा निवडणुका?

नाशिक मनपा
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ओबीसी आरक्षण (OBC reservation) नंतर प्रभाग रचना (Ward composition) यावरून राज्यातील १८ महापालिकांची निवडणूक (election) लांबनीवर पडली आहे. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे.आता गुरुवारी (दि. १७) याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) होणाऱ्या सुनावणीची प्रतीक्षा असून याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान यापूर्वी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी (Nashik Municipal Election) तीन सदस्य प्रभाग रचना ठरविण्यात आली असून अंतिम मतदार यादी (voter list) तयार झाली आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) पुवीच्या म्हणजे 2017 नुसार चार सदस्य प्रमाणे निवडणूक (election) होईल असे म्हटले तर फक्त 133 जागा वरून पुन्हा 122 सदस्य नाशिक पालिकेत होईल. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) डिसेंबर ते जानेवारी महिन्यात निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिकेत मार्च महिन्यापासून प्रशासक राजवट आहे. आता प्रभागरचना व मतदार यादी यापूर्वीच अंतिम झाल्याने डिसेंबरमध्ये महापालिका, नगरपालिकांची निवडणूक (election) जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाला नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान घेणे आवश्यक असणार आहे कारण फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्यातील दहावी आणि बारावीच्या अंदाजे २८ लाख विद्यार्थ्यांची (students) बोर्डाची परीक्षा सुरु असते.

त्यावेळी निवडणुकीसाठी यंत्रणा अपुरी पडू शकते. आणि अशावेळी मतदान केंद्रांची अडचण निर्माण होईल. त्यातच कडक उन्हाळा आणि पुन्हा पावसाळा त्यामुळे त्या काळात निवडणूक घेणे अशक्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२२ ते २० फेब्रुवारी २०२३ या ८५-९० दिवसांतच पालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उरकून घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com