
नाशिक | किशोर चौधरी Nashik
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महानगरपालिकेच्या नव्या आरक्षण सोडतीनंतर ( NMC Reservation Draw ) इंदिरानगर भागातील प्रभाग क्रमांक 39, 40 व पाथर्डी परिसरातील 44 प्रभागात विद्यमान नगरसेवकांना धक्के बसले आहेत. काहींना दुसर्या प्रभागात विस्थापित व्हावे लागणार असून प्रभाग क्रमांक 44 मधील एकमेव उरलेल्या सर्वसाधारण उमेदवाराची जागा ही सर्वसाधारण महिलांसाठी आल्याने इच्छुक असलेल्या सर्व पुरुष उमेदवारांचा बिमोड झाला असून विद्यमान नगरसेवक सुदाम ढेमसे यांनाही धक्का बसला आहे.
महानगरपालिकेच्या अगोदर जाहीर झालेल्या आरक्षणानंतर मागासवर्ग प्रवर्गच्या आरक्षणासोबतच महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीमुळे काही विद्यमान नगरसेवकांना आपला पारंपरिक प्रभाग सोडण्याची वेळ आली आहे. प्रभाग 39 मधील उर्वरित दोन्ही जागा इतर मागासवर्गीय महिला आणि सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाल्याने सभागृहनेते सतीश सोनवणे यांना धक्का बसला आहे. त्याजागी त्यांच्या पत्नी अनिता सोनवणे या उमेदवारी करू शकतात तर स्वतः सोनवणे हे प्रभाग 29 किंवा 40 मधून आपली दावेदारी दाखल करणारची शक्यता आहे.
सोनवणे यांच्या पाठोपाठ माजी नगरसेवक अमोल जाधव यांनाही धक्का बसला असून त्यांच्या पत्नी संगीता जाधव पाथर्डी प्रभागातून निवडून आल्या होत्या. त्यांची उमेदवारी पुढे येण्याची शक्यता आहे. मनसेनेच्या शहराध्यक्ष अर्चना जाधव माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड यांच्या इतर मागासवर्गीय गटातील जागा सुरक्षित राहिले आहेत. तर सागर देशमुख यांनाही आपल्या पत्नी पूजा देशमुख यांच्यासाठी तयारी करावी लागणार आहे. त्याचबरोबर सेनेचे रवींद्र गामणे यांच्या पत्नी अर्चना गामणे इथून तयारी करतील असे वाटते.
प्रभाग क्रमांक 40 मध्ये एक सर्वसाधारण महिला इतर मागासवर्गीय पुरुष व खुली जागा असल्याने मोठ्या प्रमाणात भाजपच्या इच्छुकांना पैकी एखाद्या प्रबळ दावेदारी साठी जागा निश्चित केली जाऊ शकते. भाजपच्या प्रशांत बडगुजर, नेहा म्हैस पुरकर यांच्या अपेक्षा वाढल्या असून शिवसेनेचे देवानंद बिरारी, निलेश साळुंखे यांच्यासाठी प्रभाग 40 मधील मार्ग मोकळा झाला आहे. संतोष कमोद,संदीप जगझाप, सुनील खोडे, संजय गायकवाड, आकाश खोडे सोनाली गायकवाड राजीव थेटे इतरांचे मार्ग इच्छुक असलेल्या प्रभागातून पक्षात दावेदारी साठी सुकर झाले आहेत.
प्रभाग क्रमांक 44 मधून अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती पुरुष व सर्वसाधारण महिलासाठी जागा असल्याने सर्वाधिक पुरुष इच्छुक असलेल्या या प्रभागा मधून पुरुष उमेदवारांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. विद्यमान नगरसेवक सुदाम ढेमसे त्यांच्यासह इच्छुक असलेले सेनेचे बाळकृष्ण शिरसाट, वसंत पाटील, त्रंबक कोंबडे, रवींद्र गामणे, चेतन चुंबळे, दीपक केदार त्याचबरोबर भाजपचे सुदाम कोंबडे, संजय नवले, एकनाथ नवले, जितेंद्र चोरडिया, राष्ट्रवादीचे सोमनाथ बोराडे, ज्ञानेश्वर महाजन सुनील कोथमिरे व शिवा तेलंग तसेच अनिल गायकवाड यांना पाच वर्षांची वाट पाहावी लागणार असली तरी हे सर्वजण त्यांच्या सौभाग्यवतींना उमेदवारीसाठी पुढे करतात का, हे येणार्या काही दिवसात स्पष्ट होईल.
या सर्वांमध्ये डॉ. राजेश पाटील यांच्या पत्नी डॉ. पुष्पा पाटील यांनी मात्र एकमेव महिला म्हणून कधीपासून तयारी सुरू केली होती त्याचा फायदा त्यांना होणार आहे. अनुसूचित जातींमधून माजी नगरसेवक भगवान दोंदे यांच्या पत्नी शैला दोंदे, संदेश मुंडे यांच्या पत्नी सुप्रिया एकमोडे ज्योती गायकवाड त्याचबरोबर इतर इच्छुक आहेत. अनुसूचित जमातीमधून भाजपचे गणेश ठाकूर सेनेकडून, ज्ञानेश्वर शिंदे इतरांची नावे आहेत तर सर्वसाधारण महिलांमधून माधुरी नवले, सोनाली नवले, अर्चना गामणे, डॉ. पुष्पा पाटील, पूजा तेलंग, रोहिणी केदार यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.
पाथर्डी परिसर प्रभाग हा तसा सातत्याने नव्या उमेदवारांना संधी देणारा ठरत असल्याने या वेळीही या इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. या वेळेसही तिघेही नवीन उमेदवारास निवडून येतील. त्यामुळे इतिहास खंडित करण्याची परंपरा कोणीही करू शकणार नाही, असे सध्या तरी दिसत आहे. भाजप, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागांमधून इच्छुक व विद्यमान नगरसेवकांना कंबर कसावी लागणार आहे.