इच्छुकांची महापालिका निवडणूक तयारी; नागरिकांमध्ये चर्चा

इच्छुकांची महापालिका निवडणूक तयारी; नागरिकांमध्ये चर्चा
USER

जुने नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आता फक्त नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे, त्यातील साधारण तीन महिने आचारसंहिताचे धरले तर आणखी कमी कालावधी इच्छुकांना मिळणार आहे. म्हणून विविध पक्षांसह अपक्ष यांनीदेखील आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून लॉक डाऊन काळातही काही लोकं विविध प्रकारे क्लुप्त्या लावून लोकांमध्ये संपर्क वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस यांनी एकत्रित येऊन महाविकासआघाडी तयार करत महाराष्ट्राची सत्ता काबीज केली तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून महाराष्ट्र राज्यात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने एकत्रित पणे लढून विरोधी पक्षांवर चांगले वर्चस्व निर्माण केल्याचे आतापर्यंत चित्र आहे. तर फे्रुवारी 2022 मध्ये नाशिक महानगर पालिका निवडणूक होणार आहे.

यासह मुंबई महापालिका निवडणूक देखील होणार आहे. मात्र नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने महाविकास आघाडीचे मफोकसफ नाशिक महापालिकेकडे असल्याचे आतापर्यंतच्या उलाढाल वरून दिसून येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी आतापर्यंत विविध पद्धतीने नाशिकमध्ये आपले बळ वाढविण्याचे प्रयत्न केले आहेत.

वर्षाच्या सुरुवातीला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दोन दौरे नाशिकमध्ये करून शिवसेनेची बाजू अधिक भक्कम करण्याच्या प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी असलेले व नाशिक जिल्ह्यातसह शहरात चांगले वजन ठेवणारे माजी आमदार वसंत गिते तसेच सुनील बागुल या दोन दिग्गजांना त्यांनी पुन्हा शिवसेनेत आणून शिवसेनेचे वजनफ आणखी वाढवण्याचे प्रयत्न केले. त्याचप्रमाणे नाशिक महनगर प्रमुखपदी नवीन नाशिकचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्याकडे देऊन मिशन महापालिकेचीफ सुरुवात देखील करण्यात आल्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातले दिग्गज नेते ना. छगन भुजबळ यांनीदेखील महापालिका निवडणूक संदर्भात आपले नियोजन सुरू ठेवले आहे.

काँग्रेस तसं पाहायला गेले तर काही प्रमाणात या दोन पक्षांच्या मागे दिसत असली तरी ऐन वेळेला काँग्रेसचे नियोजन होऊन धक्कादायक निकाल देण्याची त्यांची परंपरा आहे. त्याच प्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी पालकमंत्री आ. गिरीश महाजन तसेच शहरातील तिन्ही आमदार, महापौर यांनी देखील आपलीच सत्ता कायम ठेवणे संदर्भात काम सुरू केले आहेत.

पंचवटी येथील माजी आ. बाळासाहे सानप यांना पुन्हा भाजपात आणण्यात पदाधिकार्‍यांना यश मिळाले. मोठ्या पक्षांसह अनेक छोटे पक्षांनी देखील महापालिका निवडणुकीसंदर्भात तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. जुने नाशिक परिसरात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेऊन खा. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष अनेक वर्षांपासून रिक्त होते. त्याची पूर्तता करून जुने नाशिक परिसरात निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

त्याच प्रमाणे समाजवादी पार्टीसह इतर काही पक्षांनी देखील पदाधिकार्‍यांची नेमणूक करून महापालिका निवडणुकीसाठी तयारी केल्याचे दिसून येत आहे. सध्या लॉक डाऊनचे काळ सुरू असले तरी विविध प्रकारे इच्छुक आपले संवाद मतदारांमध्ये वाढविण्यावर भर देताना दिसत आहे.

जुने नाशिक परिसरात नुकत्याच झालेल्या ईद-उल-फित्र तसेच अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देण्यासाठी इच्छुकांनी सोशल मीडियावर आपले पोस्ट टाकून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे काही ठिकाणी फलक देखील लावण्यात आले होते. दरम्यान निवडणुकाला काही महिन्यांचा अवधी जरी असली तरी वातावरण निर्मिती आतापासून सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तो चर्चेचा विषय बनला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com