मिळकत सर्व्हेक्षणात दिरंगाई; मनपा आयुक्तांचा लिपिकांना अल्टिमेटम

मिळकत सर्व्हेक्षणात दिरंगाई; मनपा आयुक्तांचा लिपिकांना अल्टिमेटम
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मिळकत सर्वेक्षणातील 22 हजार मिळकतींना कर लागू करण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी महापालिकेच्या (NMC) 57 लिपिकांना (Clerk) कारणे दाखवा नोटीस (Notice) बजावल्याने या लिपिकांनी आपले खुलासे केले आहेत...

57 पैकी 30 लिपिकांनी प्रक्रिया राबविल्याचे म्हटले आहे. 27 लिपिकांनी प्रक्रियाच राबवली नसल्याने आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनी लिपिकांना कर लागू करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डिसेंबर अखेरचा अल्टिमेटम (Ultimatum) दिला आहे.

करोनामुळे (Corona) घटलेले उत्पन्न वाढीसाठी महापालिकेने घरपट्टीची थकबाकी वसुली करण्यासह घरपट्टी लागू न झालेल्या मिळकती टॅक्स नेटमध्ये आणण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत.

त्या संदर्भातील जबाबदारी जाधव यांनी मुख्य लेखापरीक्षक बोधीकिरण सोनकांबळे यांच्याकडे सोपवल्यानंतर त्यांनी मिळकत सर्वेक्षणातील (Income Survey) मिळकतींना टॅक्स नेटमध्ये आणण्यासाठी मोहीमच उघडली आहे.

मिळकतींची विविध कर विभागाने फेरतपासणी केल्यानंतर दिली 59 हजार मिळकतींपैकी 49 हजार मिळकतींना नोटीसीची प्रक्रियादेखील पूर्ण करत, त्यात 22 हजार मिळकती या अधिकृत, तर 27 हजार मिळकती या अनधिकृत असल्याचे कर विभागाच्या तपासणी आढळले.

त्यामुळे अधिकृत ठरलेल्या 22 हजार मिळकतींना तत्काळ घरपट्टी लागू करण्याचे निर्देश दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. या मिळकतींना नवीन करयोग्य मूल्य दरानुसार घरपट्टी (Property Tax) लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

या प्रक्रियेत सहा विभागांतील लिपिकांनी दिरंगाई केल्याचे कांबळे यांनी सहा विभागांत जाऊन केलेल्या दप्तर तपासणी समोर आले आहे. त्यामुळे कामात कुचराई केल्याचे तपासणीत आढळून आल्याने 57 लिपिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.