मनपा आयुक्त साधणार नाशिककरांशी संवाद

मनपा आयुक्त साधणार नाशिककरांशी संवाद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिककरांच्या (nashikkar) समस्या (issues) जाणून घेत त्याच्यावर उपाय योजना (Remedial plan) करण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) शहरातील विविध प्रभागांना भेटी देउन स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहे. सकाळच्या सत्रात ते नागरिकांची संवाद साधणार आहे.

येत्या शनिवारपासून (दि.१७) या उपक्रमाची पंचवटी (panchavati) विभागातून सुरुवात होणार आहे. यापूर्वी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) आयुक्त असताना त्यांनी अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला होता. 13 मार्च 2022 पासून नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे शहराचा विकास काहिसा संथ झाला आहे. सभागृह विसर्जित झाले असल्याने लोकप्रतिनिधीनांही नागरिकांच्या समस्या सोडवण्यात पुर्वीच्या तुलनेत काहिशा मर्यादा पडत आहे.

ही परिस्थिती पाहता नागरिकांना भेडसवणार्‍या समस्या, त्यांच्या अपेक्षा व त्यावर पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी आयुक्त डाॅ.पुलकुंडवार शहरातील विविध प्रभागांना सकाळच्यावेळी भेटी देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहे. जाॅगिंग ट्रॅक (jogging track), उद्यानांची पाहणी (inspection of gardens), घंटागाडी कचरा संकलन, परिसरातील साफसफाई, रस्ते व महापालिकेकडून नागरिकांना पुरविण्यात येणार्‍या सुविधा यांचा ते एंकदर आढावा घेतील.

या उपक्रमाची येत्या शुक्रवारपासून सुरुवात होणार असून पंचवटितील प्रभाग क्रमांक तीन व चार येथे भेट देऊन ते संवाद साधणार आहे. त्यामाध्यमातून नाशिककर व प्रशासन यांच्यात संवादाचा सेतु उभारण्याचा आयुक्तांचा प्रयत्न आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com