तोडफोड प्रकरणानंतर बिटको हॉस्पिटलला मनपा आयुक्तांची भेट

तोडफोड प्रकरणानंतर बिटको हॉस्पिटलला मनपा आयुक्तांची भेट

नाशिकरोड | Nashik

महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको कोविड रुग्णालयात नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास बिटकोचे प्रवेशव्दार फोडून कार आत घुसवत रुग्णालयाचे नुकसान केले. नंतर कर्मचा-यांना मारहाण व शिवीगाळ केली.

तोडफोड प्रकरणानंतर बिटको हॉस्पिटलला मनपा आयुक्तांची भेट
बिटको तोडफोड प्रकरण: कोण आहेत राजेंद्र ताजणे ? का केला असा प्रकार?

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन कर्मचारी, डॉक्टर, तसेच रुग्णांची विचारपूस करत त्यांचे मनोधैर्य वाढवले.

त्याचबरोबर ताजणे यांच्याविरुध्द जास्तीत जास्त कठोर कारवाई व शिक्षा कशी होईल, याबाबत पोलिस आयुक्तांकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बिटकोचे नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, विभागीय अधिकारी संजय गोसावी, बांधकाम अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता धर्माधिकारी, उपअभियंता निलेश साळी, डोंगरे आदी उपस्थित होते. आयुक्तांनी रुग्णालयात येऊन नुकसानीची माहिती घेतली. विविध विभागांना भेटी देऊन अधिकारी, कर्मचा-यांशी चर्चा केली. त्यांच्याशी व रुग्णांशी चर्चा करत मनोबल वाढवले. धीर सोडू नका, प्रशासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे आहे. रुग्णांची सेवा सुरुच ठेवा असा संदेश दिला.

आयुक्तांनी कालच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, कारने नुकसान झाली ती जागा पाहिली. एमआरआय मशीनची पाहणी केली. तोडफोड प्रकरणाची सविस्तर महिती डॉ. जितेंद्र धनेशवर यांच्याकडून घेतली.

पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले की, कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. काही घटना अनपेक्षित असतात. पोलिस, सुरक्षा असूनही त्या घडतात. त्यामुळे कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. पुन्हा अशा घटना घडू नये साठी ताजणेंसारख्या प्रवृत्तींविरुध्द जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात येईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com