मनपा आयुक्तांची बिटको रुग्णालयाला भेट

दुसर्‍या आक्सिजन प्लॅन्टसाठी जागेची पहाणी
मनपा आयुक्तांची बिटको रुग्णालयाला भेट
USER

नाशिकरोड । Nashik

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज नाशिकरोडच्या बिटको कोविड रुग्णालयाला भेट दिली. बिटकोर रुग्णालयात दुसरा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याबाबत जागेची पाहणी केली.

बिटकोतऑक्सिजन टंचाई असल्याने रुग्णांना परत जावे लागते. स्टाफ अपुरा असल्याने करोना रुग्णांना वेळेत औषध व जेवण मिळत नाही. त्यामुळे नातेवाईक रुग्णांसोबतच राहतात. त्याची दखल आयुक्तांनी घेतली. रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. महापालिकेकडून रुग्णांना देण्यात येणार्‍या नाश्ता व जेवणाचे वेळेत नियोजन करण्याचे आदेश दिले.

जुन्या नाशिकमधील डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व निकामी झाल्याने ऑक्सिजन गळती होऊन 24 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर स्टॅन्डबाय ऑक्सिजन प्रकल्प असावा यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त जाधव यांनी बिटको रुग्णालयाच्या आवारातील ऑक्सिजन प्रकल्पाची आज पाहणी केली.

या प्रकल्पाच्या परिसरात वाहने उभी करु नयेत, कोणीही तेथे जाणार नाही व प्रकल्पाची सुरक्षा अबाधित राहील याचे निर्देश त्यांनी दिले. नागजीसारखी दुर्घटना घडली तर तर दुसरी पर्यायी व्यवस्था असावी म्हणून बिटकोच्या आवारात छोट्या क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी त्यांनी जागेची पाहणी केली.

आयुक्त जाधव यांचा दौरा असतानाही बिटको रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक व मित्र परिवार याचा वावर सुरु होता. नातेवाईक रुग्णांशेजारी जाऊन जेवणाचे डबे व औषधे देत होते. तेच नातेवाईक, मित्र बाजारात फिरून करोनाचा संसर्ग वेगाने वाढवतात. त्यामुळे आयुक्तांनी रुग्णांचे नातेवाईक व मित्र यांना बाहेर काढून रुग्णालयाचे फक्त मुख्य प्रवेशव्दार सुरु ठेवण्याचे आदेश दिले.

मागील प्रवेशव्दारातून फक्त मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी गेट खोलण्याचे आदेश दिले. रुग्णांना वेळेत जेवण नाश्ता मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. आयुक्तांनी प्रशासनाला रुग्णांना सकाळचा नाश्ता 7 ते 8 आणि दुपारचे जेवण 12 ते 1 दरम्यान तर रात्रीचे जेवण 7 ते 8 दरम्यान देण्याचे आदेश दिले. रुग्णालयात स्वच्छतेचे आदेश दिले. या आदेशाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com