गुणवत्ता राखून कामे वेळेत पूर्ण करा; मनपा आयुक्तांचे बांधकाम विभागाला आदेश

गुणवत्ता राखून कामे वेळेत पूर्ण करा; मनपा आयुक्तांचे बांधकाम विभागाला आदेश
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिका (Nashik NMC) हद्दीतील पूर्व, पश्चिम व पंचवटी विभाग (East, West and Panchavati divisions) अंतर्गत सुरू असलेल्या व कार्यादेश देणे बाकी असलेल्या कामांची (Works) व परिसरांची पाहणी प्रशासक तथा महापालिका आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी करून विविध निर्देश बांधकाम विभागाला दिले. पूर्व ,पश्चिम व पंचवटी विभागात कामे सुरू आहेत, त्या कामांची गुणवत्ता राखली जाऊन वेळेत व गतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी शहर अभियंता नितीन वंजारी (Nitin Vanjari) व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिले....

बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरातील विविध भागात विकासकामे (Development work) सुरू असून काही विकास कामांचे कार्यारंभ आदेश देणे बाकी आहे, अशा परिसराची पाहणी केली. यावेळी कामांमध्ये कुठलीही दिरंगाई होणार नाही, याबाबतही आदेश त्यांनी दिले.

नाशिक पूर्व विभागातील मुंबई नाका ते हॉटेल छान जवळील शिवाजी वाडी घरकुल योजनेचा 30 मीटर डी. पी.रस्ता, इंदिरानगर बोगदा ते साईनाथ नगर चौफुली, वडाळा चौफुली ते एचपी गॅस गोडाऊन रविशंकर मार्गापर्यंत, सावता माळी मार्ग, एचपी गॅस गोडाऊन जंक्शनपासून रविशंकर मार्गाने के. के. वाघ इंग्लिश स्कूल जवळील प्रस्तावित क्रीडा संकुल कामाची पाहणी करण्यात आली, सावता माळी मार्ग ते नाशिक -पुणे हायवे पर्यंत प्रस्तावित कामांची पाहणी करण्यात आली.

पोद्दार शाळेपासून उजव्या बाजूने प्रस्तावित काँक्रिटरोडची पाहणी करण्यात आली. पश्चिम विभागातील बाळासाहेब ठाकरे इतिहास संग्रहालय येथे उद्यान रिक्रिएशन सेंटर विकसित करणे, विसे चौक ते कुसुमाग्रज स्मारक रस्ता अस्तरीकरण करणे, कुसुमाग्रज स्मारक ते गंगापुर नाका गांगुर्डे हॉस्पिटल दरम्यानचा रस्ता खडीकरण करणे, चोपडा लॉन्स ते डॉ. केकाण हॉस्पिटल (जोशीवाडा) रस्ता अस्तरीकरण करणे, घारपुरे घाट गोदावरी नगर येथे बोट क्लब बांधणे, पंचवटी विभागातील नाट्यगृह इमारत व त्यालगतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे, गुंजाळ बाबानगर पुलाचे रुंदीकरण करणे यासह मखमलाबाद प्रभाग क्रमांक 6 मधील कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकारी, विभागीय अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.