मनपा आयुक्तांनी गायलेल्या 'या' गाण्याची सर्वत्र चर्चा

नाशिक महापालिकेचा ४० वा वर्धापनदिन उत्साहात
मनपा आयुक्तांनी गायलेल्या 'या' गाण्याची सर्वत्र चर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेचा (Nashik Municipal Corporation) ४० वा वर्धापनदिन (Anniversary) नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त कालिदास कला मंदिरामध्ये (Kalidasa Kala Mandir) सांस्कृतिक कार्यक्रमाचे (Cultural Events) आयोजन करण्यात आले होते...

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळाच्या एमडी लीना बनसोड, उपायुक्त मनोज घोडे-पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी हिंदी गीत सादर केल्याने त्याची विशेष चर्चा सुरु आहे. नाशिकच्या अनेक वैशिष्ट्यांचा उल्लेख करून नाशिककरांसाठी अभिमानास्पद काम मनपाकडून होत राहील, अशी ग्वाही आयुक्तांनी याप्रसंगी दिली. तसेच आयुक्त डॉ. पुलकुंवार आणि गायिका रागिनी कामटीकर (Singer Ragini Kamtikar) यांनी 'सलामे इश्क मेरी जान' हे गाणं सादर केले. आयुक्तांच्या या गाण्याला उत्स्फूर्त दाद मिळाली.

तसेच मान्यवरांनी उभ राहून टाळ्यांचा गजर केला. वन्स मोअर मिळाला. तर शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी 'विठू माऊली' हे गाणं म्हणत असताना आयुक्त अचानक व्यासपीठावर आले आणि त्यांनी वंजारी यांना साथ दिली. यावेळी विठ्ठलाचा गजर सभागृहात निनादून गेला. टाळ्यांच्या कडकडाटात दोन्ही अधिकाऱ्यांना प्रेक्षकांनी दाद दिली.

याशिवाय लिना बनसोड यांनी 'ही वाट दूर जाते' हे मराठी गाणे सादर करून दाद मिळवली. कार्यक्रमात कार्यकारी अभियंता गणेश मैद्य यांनी 'मनी नाही भाव', विभागीय अधिकारी मयूर पाटील यांनी 'मेरे सामनेवाली खिडकी मे', सुनील आव्हाड यांनी 'क्या खूब लगती हो', कैलास दराडे यांनी 'पल पल दिल के पास', शिक्षिका मंजुषा बिडवई यांनी 'माय भवानी' इकबाल शेख यांनी 'मै निकला गड्डी लेके', श्याम राऊत त्यांनी 'चलते चलते', गुणवंत वाघ यांनी चलते चलते', उपअभियंता रवींद्र बागुल यांनी 'मदहोश दिल की धडकन', विनीत बीडवई यांनी 'आदमी मुसाफिर है', समीर रकटे यांनी 'यम्मा यम्मा' हे गाणं सादर केले. सर्वच गाण्यांना दाद मिळाली. तर गायिका मृणाली मालपाठक, नमिता राजहंस यांनीही गाणी (Songs) सादर केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com