नाशिक । दि.9 प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या चार विषय समिती सभापती पदाची निवडणुक उद्या (दि.10) महापालिकेत होत असली तरी यातील महिला बाल कल्याण, विधी समिती व वैद्यकिय सहाय्य व आरोग्य अशा तीन समिती सभापती पदासाठी

अनुक्रमे स्वाती भामरे, कोमल मेहरोलिया व पुष्पा आव्हाड याचे एकमेव अर्ज दाखल आहे. यामुळे हे तीन सभापती बिनविरोध निवडले गेले असुन त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करणे बाकी आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी तथा निवडणुक अधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (दि.10) ही विषय समिती सभापती व उपसभापती निवडणुक प्रक्रिया होणार आहे.

गेल्या आठ महिन्यापासुन रखडलेल्या महापालिकेच्या विषय समिती सभापती निवडणुक उद्या दिवसभरात वेगवेगळ्या वेळेत होणार असुन यासंदर्भातील तयारी नगरसचिव विभागाकडुन करण्यात आली आहे.

या महिला बाल कल्याण, विधी समिती, शहर सुधारणा व वैद्यकिय सहाय्य व आरोग्य या समितींच्या आरोग्य सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीसाठी गेल्या 1 डिसेंबरपासुन अर्ज वितरण व दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

मंगळवारपर्यत यातील महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी स्वाती भामरे, विधी समिती सभापती कोमल मेहरोलिया व वैद्यकिय सहाय्य व आरोग्य समिती सभापती पुष्पा आव्हाड यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उद्याच्या निवडणुकीत निवडणुक अधिकारी या तीन सभापतींच्या नावाची घोषणा करणार आहे. तसेच महिला बाल कल्याण समिती उपसभापती पदाकरिता मिरा हांडगे, विधी समिती उपसभापती पदासाठी भाग्यश्री ढोमसे, वैद्यकिय सहाय्य व आरोग्य समिती उपसभापती म्हणुन निलेश ठाकरे यांचेही एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्यात जमा असुन उद्या निवडणुक अधिकारी त्यांच्या नावाची घोषणा करणार आहे.

केवळ शहर सुधारण समिती सभापती पदासाठी भाजपच्या छाया देवांग व शिवसेनेचे सुदाम ढेमसे यांचे दोन अर्ज आल्यामुळे या पदाकरिता निवडणुक प्रक्रिया होणार आहे. याच समिती उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी अलका अहिरे यांसमोर सुदाम ढेमसे यांचाच अर्ज दाखल आहे.

यामुळे या पदासाठी निवडणुक प्रक्रिया होणार आहे. या समितीच्या पदांसंदर्भात निवडणुक होणार असली तरी या समितीत भाजपचे बंहुमत असल्याने भाजपचाच सभापती व उपसभापती होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे.