मनपा प्रशासनाकडून विकासकामांना खोडा : महापौर

मनपा प्रशासनाकडून विकासकामांना खोडा : महापौर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महानगरपालिकेच्या निधीतून सिटी सेंटर मॉल तसेच त्रिमूर्ती चौक येथील उड्डाणपूल व मायको सर्कल येथील उड्डाणपूल असे दोन उड्डाणपूल 250/- कोटी रुपयांच्या मनपाच्या निधीतून नाशिक महानगरपालिकेने प्रस्तावित केलेले आहे.

मात्र मनपा प्रशासनाचा हटवादीपणा असून जाणीवपूर्वक ते विकास कामांना खोडा घालत आहे, ही बाब निंदनीय असल्याचे महापौर सतिश नाना कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

या कामांच्या निविदा देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत परंतु नाशिक महानगरपालिकेने महासभा ठराव क्रमांक 298 दिनांक 15/09/2020 अन्वये नाशिक शहरातील सर्व 31 प्रभागातील 127 नगरसेवकांची कामे यामध्ये अंतर्भूत करून ही कामे नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे अंदाजपत्रकात समाविष्ट केलेली नसल्याने सद्यस्थितीत नगरसेवकांना सदरची कामे अत्यावश्यक वाटत असुन नागरिकांच्या सूचना घेऊन त्यांनी ती कामे ठराव क्रमांक 298 मध्ये सुचविली होती, सदर कामांची अंमलबजावणी बाबत वेळोवेळी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला असल्याचे सुतोवाच महापौरांनी केले.

सदस्यांनी सुचविलेल्या कामांबाबत सदयस्थित मनपाचे उत्पन्न घटले आहे त्यामुळे सदरची कामे हाती घेता येत नाही असे प्रशासनाने कळविलेले आहे. मात्र मनपा प्रशासनाचा हा हटवादीपणा असून जाणीवपूर्वक ते विकास कामांना खोडा घालत आहे ही बाब निंदनीय असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com