Nashik : मनपा प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांची बदली

Nashik : मनपा प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांची बदली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक मनपाचे प्रशासन उपायुक्त  मनोज घोडे-पाटील यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांची बदली करण्यात आली आहे....

त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. कर उपायुक्त अर्चना तांबे व मनोज घोडे पाटील हे या दोघांचीही बदली होणार होती. आठवड्यापूर्वी तांबे यांची बदली झाली असून काल पाटील यांची देखील बदली करण्यात आली आहे.

चांगला प्रशासकीय अनुभव असलेला अधिकारी म्हणून पाटील यांची ओळख होती तर महाविकास आघाडीच्या काळात तीन सदस्य प्रभाग रचना करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.

त्यावेळी निवडणूक प्रक्रिया देखील सुरू झाली होती म्हणून मतदार यादी, आरक्षण तसेच हरकती व त्याचा निपटारा करण्यात पाटील यांनी उत्तम काम केले होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com