मनमाड नगरपरिषद प्रशासकपदी मुंढे

मनमाड नगरपरिषद प्रशासकपदी मुंढे
मनमाड

मनमाड । प्रतिनिधी Malegaon

मनमाड (manmad) नगर परिषदेचे (nagar parishad) नगराध्यक्ष (Mayor) आणि सर्व नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ बुधवार दि. 29 डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे त्यामुळे शासनाने पालिकेवर प्रशासक (Administrator) म्हणून मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे (Chief Officer Vijay Kumar Mundhe) यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पालिकेवर आता लोकप्रतिनिधीचे राज्य संपुष्टात येऊन आता त्यांच्या जागी गुरुवारपासून अधिकारी राजला सुरुवात होणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून करोना धुमाकूळ घालत असून तो अद्यापही पूर्णपणे आटोक्यात आलेला नसतांना आता ओमायक्रॉनचे (omicron) आगमन झाले असल्याने निवडणुका (election) अनिश्चत काळासाठी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मुदत संपल्यानंतर लवकरच निवडणुका होतील असे वाटत असलेल्या विद्यमान, भावी नगरसेवकांचा मात्र हिरमोड झाला आहे.

मनमाड नगर परिषदेची 2016 मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यावेळी नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात आल्यामुळे शिवसेनेच्या (shiv sena) पद्मावती धात्रक (Padmavati Dhatrak) यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती शिवाय 31 पैकी तब्बल 18 नगरसेवक (Corporator) शिवसेनेचे निवडून आले होते. 5-5 नगरसेवक काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीचे तर रिपाई 2 आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आले आहे.

आज 29 डिसेंबर रोजी नगर परिषदेची मुदत पूर्ण झाली असल्यामुळे राज्य शासनाने परिपत्रक काढून पालिकेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे यांची नियुक्ती केली आहे. आता निवडणूक कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.