मुंबई-नांदेड गाडी धावणार किनवटपर्यंत

मुंबई-नांदेड गाडी धावणार किनवटपर्यंत

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई-नांदेड विशेष गाड़ी किनवट स्टेशनपर्यंत चालवली जाणार आहे.

हा बदल 13 ऑक्टोबरपासून पुढील आदेशपर्यंत ही गाडी किनवटपर्यंत धावेल. गाड़ी क्रमांक - 01141 डाऊन मुंबई- किनवट विशेष गाड़ी दररोज मुंबईहून 16.35 वाजता रवाना होईल.

दुसर्‍या दिवशी किनवटला 9.00 वाजता पोहचेल. नाशिकरोडला 19.55 वाजता, लासलगांवला 20.44 वाजता, मनमाडला 21.35 वाजता थांबेल. रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना,परतुर,सेलु, परभणी, पूर्णा, नांदेड, मुद्खेद, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुण्ड, बोधादीबुजुर्ग या ठिकाणीही ती थांबेल.

अप किनवट - मुंबई विशेष गाड़ी दररोज 13.30 वाजता किनवटहून मुंबईला निघेल. दुसर्‍या दिवशी मुंबईला 5.35 वाजता पोहोचेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com