आरोग्य विज्ञान विद्यापीठ
आरोग्य विज्ञान विद्यापीठ
नाशिक

‘आराेग्य विज्ञान’ च्या पदवीपूर्व परीक्षा स्थगित

नियंत्रकांची माहिती

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अर्थात एमयूएचएसच्या उन्हाळी सत्र २०२० मधील विविध विद्याशाखांच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डाॅ. अजित पाठक यांनी दिली आहे.

उन्हाळी सत्रातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग, भौतिकोपचार आदी विद्या शाखांच्या पदवीपूर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाने यापूर्वी संकेतस्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार आहेत.

पाठक यांनी सांगितले की, अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीच्या दोन याचिका आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकर घेण्यात याव्यात या मागणीसाठी एक याचिका अशा एकूण तीन याचिका परीक्षेच्या अनुषंगाने दाखल झाल्या असून तीनही याचिकांवर उच्च न्यायालयात ३१ जुलै राेजी सुनावणी होणार आहे. त्या निर्णयानंतरच विद्यापीठाकडून परीक्षांचे सविस्तर आदेश काढण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

आरोग्य शिक्षणातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व संबंधितांनी परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही अफवा व खोटया माहिती व बाातम्यांवर विश्वास ठेवू नये. परीक्षेसंदर्भात कोणत्याही परिपत्रकाची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाच्या www.muhs.ac.in संकेतस्थळावर भेट द्यावी.

Deshdoot
www.deshdoot.com