महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा उद्या ऑनलाईन दीक्षांत समारंभ

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा उद्या ऑनलाईन दीक्षांत समारंभ

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विसावा दीक्षान्त समारंभ उद्या (दि. 29) रोजी नाशिक येथे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे...

याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा ऑनलाईन दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री मा.नामदार श्री. अमित देशमुख आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर यांनी सांगितले की, विद्यापीठाचा विसावा दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्या अधिसभागृहात सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले असून या समारंभात ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देतांना कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 8064 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 85 सुवर्णपदक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व संशोधन पूर्ण केलेल्या 03 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत माहिती देतांना विद्यापीठाचे मा. परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, दीक्षांत समारंभात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 517, दंत विद्याशाखा पदवीचे 1926, आयुर्वेद विद्याशाखेचे 726, युनानी विद्याशाखेचे 80, होमिओपॅथी विद्याशाखेचे 943, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे 509,

बी.पी.टी.एच. विद्याशाखेचे 134, बी.ओ.टी.एच. विद्याशाखेचे 13, बी.ए. एस.एल.पी. विद्याशाखेचे 34, बी.पी.ओ. विद्याशाखेचे 03, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे 03, पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये एम.डी.मेडिकल विद्याशाखेचे 1051, एम.एस.मेडिकल विद्याशाखेचे 673, डी.एम.मेडिकल विद्याशाखेचे 249, एम.सी.एच. मेडिकल विद्याशाखेचे 67, पी.जी.डिप्लोमा विद्याशाखेचे 262 आदी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

सदर दीक्षांत समारंभाचे https://t.jio/MUHS2021 वरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यागतांनी सदर दीक्षांत समारंभाचे प्रक्षेपण ऑनलाईन पहावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com