मोहरमनिमित्त मिरवणूकः गिरणा-मोसम संगमावर गर्दी

२०० ताबुतांचे विसर्जन
मोहरमनिमित्त मिरवणूकः गिरणा-मोसम संगमावर गर्दी

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

इस्लाम धर्म (religion of Islam) संस्थापक प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर (Hajrat Mahummad Paigambar) यांचे नातू

हजरत इमाम हसन-हुसेन (Hazrat Imam Hasan-Husain) यांनी सत्यासाठी ‘करबला’ येथे दिलेल्या बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ सुन्नी (sunni) व बोहरा मुस्लीम (Bohra Muslim) बांधवांतर्फे मोहरम सण (Muharram festival) येथे पारंपारिक पध्दतीने भावपूर्ण वातावरणात साजरा केला गेला.

करोना (corona) संक्रमणामुळे दोन वर्षापासून मोहरम सण साजरा होवू शकला नव्हता. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात मोहरम सण मुस्लीम बांधवांतर्फे (muslim community) साजरा केला गेला. शहरातील वेगवेगळ्या भागात स्थापना करण्यात आलेल्या लहान-मोठे दोनशेपेक्षा अधिक ताबूत काल भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. आज या ताबूतांची मिरवणूक (Procession) काढण्यात येवून गिरणा-मोसम नदी (Girna-Mosam river) संगमावर त्यांचे विधीवत विसर्जन केले गेले.

या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव (muslim community) सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार न घडता मिरवणूक शांततेत पार पडल्याने पोलीस-प्रशासन यंत्रणेस दिलासा मिळाला. करबलाच्या लढाईत सत्याचे पालन करण्यासाठी हजरत इमाम हसन-हुसेन यांनी बलिदान देण्याचे पसंत केले होते. इमाम हुसेन यांच्या या बलिदानाचे स्मृतीस उजाळा देण्यासाठी सुन्नी, बोहरा व शिया पंथिय मुस्लीम बांधवांतर्फे पारंपारिक पध्दतीने मोहरम सण साजरा केला जातो.

शहरातील इस्लामपुरा, नया पुरा, रमजान पुरा, सलीमनगर, निहाल नगर, गोल्डननगर, रजा पुरा, गुलशेर नगर, चंदनपुरीगेट, चांदणी चौक, जाफर नगर, आयेशानगर, पवारवाडी, बिसमिल्ला नगर, राजापुरा आदी वेगवेगळ्या भागात सुन्नी व शिया पंथीय मुस्लीम बांधवांतर्फे मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर ताबूतांची स्थापना करण्यात आली होती. यानिमित्त 27 सवारी, 10 शेरबाग, 4 आलम व 1 घोडा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील मोहरमनिमित्त करण्यात आले होते.

काल शिया पंथीय मुस्लीम बांधवांनी स्थापन केलेल्या ताबूताची चंदनपुरी गेट भागातून मातम करत मिरवणूक (Procession) काढत ताबूताचे विसर्जन केले. तर सुन्नी व शिया पंथीय मुस्लीम बांधवांतर्फे ताबूत दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. चांदणी चौकातील चांदीचा ताबूत हे विशेष आकर्षण ठरले होते. गत 71 वर्षापासून चांदीच्या ताबूताची स्थापना हाजी नियामुद्दीन जुगनू यांच्या परिवारातर्फे केली जात आहे. सलीमनगर भागातील मन्नतवाली ताबूत तसेच निहालनगर भागातील मिठाईवाली ताबूताचे दर्शन घेण्यासाठी मुस्लीम बांधवांनी रात्री उशीरापर्यंत गर्दी केली होती.

नवस करण्यासाठी व फेडण्यासाठी मन्नतवाली ताबूताचे दर्शन घेतले गेले. तर मिठाईवाली ताबूतावर वेगवेगळे प्रकारचे मिष्ठान्न भाविकांतर्फे चढविले जात होते. ताबूताची स्थापना केलेले मंडप फुलांनी सजविण्यात आले होते. पहाटेपर्यंत ताबूतांचे दर्शन घेण्यासाठी महिलांसह अबालवृध्द व मुस्लीम बांधवांनी भरपावसात गर्दी केली होती. यावेळी खिचडी, शरबत व गोड भाताचे वाटप ठिकठिकाणी करण्यात आले.

आज सकाळी सुन्नी व बोहरा पंथीय मुस्लीम बांधवांतर्फे स्थापित केलेल्या ताबूतांची पारंपारिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली. शहरातील वेगवेगळ्या भागातून मिरवणुका चंदनपुरी गेट भागात आल्यानंतर तेथून मुख्य मिरवणुकीस प्रारंभ केला गेला. यावेळी इमाम हुसेन व त्यांच्या कुटूंबियांनी दिलेल्या बलिदानाप्रित्यर्थ त्यांना आदरांजली वाहत मरसियाचे वाचन करीत मुख्य मिरवणूक बजरंगवाडी, मरिमाता चौक मार्गे झांजेश्वर मंदिरालगत असलेल्या गिरणा-मोसम नदी संगमावर पोहचली.

ताबूत पाहण्यासाठी मिरवणूक मार्गावर मोठ्या संख्येने मुस्लीम बांधवांनी गर्दी केली होती. लहान मुले व महिलांची संख्या लक्ष वेधून घेणारी होती. संपुर्ण मिरवणूक मार्गावर विविध मुस्लीम संघटनांतर्फे शरबतचे वाटप केले जात होते. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शेवटच्या ताबूतचे विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.

गिरणा-मोसम नदीला पूर आल्याने ताबूत विसर्जन काळात अनुचित प्रकार घडू नये यास्तव मनपा अग्निशमन दलाचे जवान नदीकाठावर तैनात करण्यात आले होते.जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी, प्रांत विजयानंद शर्मा आदी अधिकारी जातीने मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. मिरवणूक मार्गासह संपुर्ण शहरात सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com