शरदचंद्र पवार मार्केटजवळ चिखलाचे साम्राज्य

शरदचंद्र पवार मार्केटजवळ चिखलाचे साम्राज्य

पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati

शरदचंद्र पवार मार्केट जवळील (sharad chandra pawar market yard nashik) वसाहतीत पावसाच्या पाण्यामुळे चिखलाचे साम्राज्य झाले आहे...

या परिसरातून चालताना रहिवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिसरात पथदीप (Streetlight) लावण्यात आलेल्या नसल्याने प्रभागाचे नगरसेवक (Corporator) झोपलेत का? असा संतापजनक प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे...

प्रभाग क्रमांक चार मधील शरदचंद्र पवार मार्केट लगत असलेल्या अष्टविनायकनगर (Ashtavinayaknagar), कृष्णानगर (Krishnanagar), कर्णनगर (Karnanagar), पवार मळा (Pawar Mala), तुळजाभवानीनगर (Tuljabhavani Nagar) या परिसरात पावसाच्या पाण्यामुळे चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे.

या भागात अजूनदेखील पथदीप लावण्यात आलेल्या नसल्याने नगरसेवक अजुन किती दिवस लोकांचा विकास थांबवणार आहेत? असा प्रश्न स्थानिक नागरीकांनी उपस्थित केला आहे .

या परिसरात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून जवळपास अडीच ते तीन हजार नागरिक वास्तव्यास आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी महेश शेळके (Mahesh Shelke) आणि महिला आघाडीच्या विद्या शेळके (Vidya Shelke) यांनी वारंवार प्रशासनाला व नगरसेवकांकडे तक्रारी केल्या असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप केला आहे.

परिसरातील समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी सुनील आजबे, गणेश हेक्कड, बाळासाहेब मुर्तडक, सुनील कासोदे, बाबासाहेब चितळे, शुभम लंवाडे, लक्ष्मण लाहमगे, पंकज येलमामे, ओमकार शिंदे, अजय खडसे, सुनिता बोडके, अंजली चितळे, गितांजली चव्हाण, वंदना पवार, कल्पना मुर्तडक, वनिता आजबे आदींनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com