एसटीची लालपरी हीच माझी देवी!

नलिनी जाधव यांचे मनोगत
एसटीची लालपरी हीच माझी देवी!

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एक महिला जिच्या हातात काही वस्तू आहेत, असे म्हंटल्यावर झाडू, लाटणे, भांडी आणि जास्तीत जास्त भाजीची पिशवी असाच साधारण विचार कोणाच्याही डोक्यात येईल, पण या पलीकडे जाऊन काही महिला आणि तरुणी हाती पकड, पान्हा, हातोडा, माकड पाना, पाईप पाना, छिन्नी, वायर स्ट्रीपर, प्लायर्स, इलेक्ट्रिक ड्रिल, नट-बोल्ट अशी अवजारे घेऊन काम करीत आहेत. स्त्री असूनही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या कार्यक्षेत्रात भरीव कामगिरी बजावून आपली छाप उमटवत आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात तंत्रज्ञ म्हणून सेवेत असलेल्या नलिनी निवृत्ती जाधव Nalini Nivruttee Jadhav यांच्याशी ‘देशदूत नवदुर्गा’ उपक्रमात Deshdoot Navdurga Campaign कार्यकारी संपादक वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधला. नाशिकच्या सातपूर आयटीआयमधून Satpur ITI नलिनी यांनी तंत्रज्ञ (टेक्निशयन) म्हणून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना एसटी महामंडळात नोकरीची संधी मिळाली. कोणतेही कामं छोटे नाही. काही कामे पुरुषांनीच करावीत, असा नियम नाही. तसा नियम असला तरी पुरुष करू शकतात तर स्त्री का करू शकत नाही, या आत्मविश्वासानेच काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

नोकरीच्या पहिल्या दिवशी विचार न केलेल्या अनेक गोष्टी उलगडल्या. तंत्रज्ञ म्हणून यंत्राशी संबंध येणार हे माहीत होते. परंतु कामामुळे मळलेले कामगारांचे कपडे पाहून आपल्याला ते जमेल का? काही वेळ असे वाटले होते, पण तेथे कार्यरत वरिष्ठ महिलांनी प्रोत्साहन दिले. कामाचे स्वरूप लक्षात आणून दिले. या वेगळ्या क्षेत्राची निवड करतांना कुटुंबियांकडूनही प्रोत्साहन मिळाले. काही करून दाखवायचे असेल तर प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज आहे. स्वतःच्या हिंमतीवर उभे राहण्याचा आत्मविश्वास शिक्षणानेच मिळाला, असे जाधव म्हणाल्या.

लालपरी स्वच्छ ठेवा...

आयुष्यात अनेक चढउतार येतात, पण शून्यातून वर येण्याची तयारी असली पाहिजे. देवीची सगळीच रूपे आवडतात, पण एसटीच्या लालपरीच्या रुपातील देवीचे देखणे रूप अधिक भावते. एक भक्त म्हणून सर्व प्रवाशांना एकच सांगणे आहे. आमच्या लालपरीचे रूप कायम देखणे ठेवण्यासाठी तिच्यात बसल्यावर अस्वच्छता करू नका, ती स्वच्छ ठेवा, असे नलिनी जाधव यांनी आपुलकीने सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com