...अखेर बस स्थानकात लालपरी झाली दाखल; अनेक बसेस आगारातून बाहेर

...अखेर बस स्थानकात लालपरी झाली दाखल; अनेक बसेस आगारातून बाहेर
Published on
2 min read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या अनेक दिवसांपासून एक जागी थांबलेली लालपरी अखेर प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. सकाळपासून अनेक आगारातून नाशिक शहरात बसेस दाखल झाल्या. लालपरी रस्त्यावर दिसू लागल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे...(MSRTC buses started in nashik depo)

एसटी कर्मचारी संघटना (ST workers union) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कर्मचारी संघटनांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. मात्र, अद्याप अनेक कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम दिसून येत आहेत. त्यामुळे संघटनांनी आवाहन करूनही कर्मचारी कामावर रुजू झालेले नाहीत.

त्यामुळे कंत्राटी कामगार (Contract workers) आणि सेवेत रुजू झालेले इतर कर्मचारी, तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवार (Waiting list workers), निवृत्त कर्मचारी (Retired workers) यांना सोबत घेऊन पोलिसांच्या फौजफाट्यात एसटी आता धावू लागली आहे.

सटाणा, मालेगाव, येवला, नांदगावसह निफाड तसेच नगर जिल्ह्यातून अनेक बसेस आज नाशिकमध्ये दाखल झाल्या. त्यामुळे शुकशुकाट असलेल्या जुने सीबीएस, नवीन सीबीएससह महामार्ग बसस्थानकावर लालपऱ्या दिसून आल्यामुळे परिसर गजबजलेला दिसून आला.

गेली दोन महिने खासगी वाहतूकदारांना अतिरिक्त भाडे देऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बसेस सुरु झाल्यामुळे आनंद व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com