लालपरीची चाके थांबली; विद्यार्थी करतायेत 'धोक्याचा प्रवास'

लालपरीची चाके थांबली; विद्यार्थी करतायेत 'धोक्याचा प्रवास'

ओझे | वार्ताहर Oze Dindori

राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचारी वर्गाने संप पुकारल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची (Rural Students) मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्याना शाळा सुरु होऊनही घरी बसावे लागत आहे तर अनेकांना मिळेत त्या वाहनाने शाळेत जावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे...

ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणत तालुक्याच्या ठिकाणी शाळा, कॉलेजला येतात. गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालय करोनामुळे बंद होत्या सध्या शहरासह ग्रामीण भागातील शाळा चालू झाल्या आहे.

परंतु, बस बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीची परवड होत आहे. ग्रामीण खेड्यामध्ये सर्व ठिकाणी खाजगी वाहने चालू नाही. तसेच, ज्या पालकाकडे मुलाना शाळेत सोडण्यासाठी वाहने आहेत असेच मोजके विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शाळा, कॉलेजमध्ये जाताना नजरेस पडतात.

ग्रामीण भागामध्ये आजही अनेक गरिब कुटूंबातील (poor family) मुले मोलमजुरी करून शिक्षण घेत आहेत. आशा कुंटूबातील विद्यार्थीना बस बंद असल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहवे लागत आहे.

सध्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रसार जवळ जवळ थांबल्यामुळे व तालुक्यातील आठवडे बाजारही चालू झाले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी शाळा व विद्यालयातील १० वी व १२ च्या विद्यार्थीचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होते आहे.

तसेच ग्रामीण जनतेची गैससोय निर्माण झाली असून यासंदर्भात महाराष्ट्र शासन (state government) व राज्य परिवहन महामंडळ यांनी यावर तोडगा काढून ग्रामीण भागातील विद्यार्थी व जनतेची पिळवणुक थांबवावी आशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com