संप सुरूच; नाशकात एसटी कर्मचाऱ्यांचे मुंडण आंदोलन

संप सुरूच; नाशकात एसटी कर्मचाऱ्यांचे मुंडण आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमध्ये राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) कर्मचार्‍यांचा संप संपण्याची चिन्हे दिसून येत नाहीयेत. आज सकाळी मुंडण आंदोलन करत आंदोलक मागण्यांवर ठाम असल्याचे दिसून आले. (Agitation third day) आज तिसऱ्या दिवशी देखील नाशिक जिल्ह्यातील एकाही डेपोमधून बस बाहेर पडली नसल्याचे चित्र आहे...

जिल्ह्यातील सर्वच आगारांचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी पुकारलेला संप हा मंगळवारी तिसऱ्या दिवशीही कायम आहे. बंद पुकारला गेल्यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या असून खिशाला मोठी कात्री लागत आहे.

नागरिक आपल्या खाजगी वाहनाने किंवा खासगी ट्रॅव्हलने प्रवास करत आहेत. मंगळवारी हा फरक दिसून येत होता. (Private Transporter)

एन.डी. पटेल रोड (N D Patel Road) येथील परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या प्रवेश द्वारा बाहेर विविध संघटनाकडून धरणे आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाला वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी (Political parties support to the ST workers agitation) देखील आपले समर्थन दिले आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये संप पुकारल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मंगळवारी दुपारी नाशिक मधील एन.डी.पटेल रोड येथील परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालासमोर कर्मचाऱ्यांनी मुंडन आंदोलन करत शासनाचा निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना कर्मचाऱ्यांनी सांगितले की शासन राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विनाकारण वेठीस धरत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने तातडीने पूर्ण केल्या तर आंदोलन अल्पावधीत मागे घेतले जाऊ शकते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com