संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर महावितरण सज्ज

संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर महावितरण सज्ज

नाशिकरोड | Nashik

संभाव्य तौक्ते चक्रीवादळाचा जर दुर्दैवाने नाशिक शहराला वा जिल्ह्याला तडाखा बसला तर वादळाच्या तिव्रतेवर विद्युत यंत्रणेचे नुकसान होऊन वीज पुरवठा खंडित होऊ शकतो.

त्यामुळे या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महावितरण सज्ज व तत्पर असून ग्राहकांनी काळजी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर महावितरणने या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सतर्क व सज्ज राहण्याचे सर्वांना निर्देश दिले आहेत. अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व त्यांची यंत्रणा या संभाव्य वादळानंतरच्या परिस्थितीशी कार्य करायला तयार आहे.

वादळाच्या तिव्रतेवर वीज यंत्रणेचे होणारे नुकसान अवलंबुन असणार असून त्यानुसार जर यंत्रणा बंद पडल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. त्यामुळे नागरिकांनी कृपया पॅनिक होऊ नये. हवेचा वेग बघून अतिउच्च दाब वा इतर वाहिन्या तातडीने बंद करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

कोव्हीड काळात सर्व आरोग्य यंत्रणा व हॉस्पिटलच्या प्रशासनानेही त्याची पर्यायी व्यवस्था ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत महावितरणचे सर्व कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात असतील त्यामुळे कृपया वारंवार फोन करून त्यांचे मनोबल कमी करू नये, अशी विनंतीही महावितरणने नागरिकांना केली आहे.

मदतीसाठी २४ तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर तसेच नाशिक येथील नियंत्रण कक्षाचे ७८७५३५७८६१ आणि ७८७५७६६३५१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय आपल्या क्षेत्रातील महावितरणचे कक्ष कार्यालय व अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com