इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन क्षेत्रात महावितरणची आघाडी

इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन क्षेत्रात महावितरणची आघाडी

नाशिकरोड । प्रतिनिधी | Nashik Road

पर्यावरणपुरक (Eco-friendly) आणि पेट्रोल (petrol), डिझेलच्या (Diesel) वाढत्या किंमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना (Electric vehicles) मोठ्या प्रमाणात स्विकारल्या जात आहे. चालू दशकाच्या अखेरपर्यंत देशात विकल्या जाणार्‍या एकूण वाहनापैकी 30 टक्के ही इलेक्ट्रीक वाहने असणार आहेत.

या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहनधारकांना त्यांच्या वाहनांच्या चार्जींगची व्यवस्था (Charging system) सहजतेने उपलब्ध व्हावी, यासाठी पुढाकार घेत महावितणने (MSEDCL) राज्यात 13 ठिकाणी इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन (Charging station) सुरु केली असून राज्यातील विविध ठिकाणी 2,375 स्टेशन्स प्रस्तावित केले आहेत.

आत्तापर्यंत महावितरणने आपल्या उपकेंद्रातील अतिरिक्त जागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वखर्चाने चार्जिंग स्टेशन (Charging station) उभारण्याचे नियोजन करुन ठाण्यात 5, नवी मुंबई - 2 पुणे - 5 आणि नागपूर -1 अशी एकूण 13 चार्जिंग स्टेशन सुरु केली आहेत.

याशिवाय महावितरणमार्फत प्रस्तावित अतिरिक्त 49 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची कामे प्रगतीपथावर आहेत. यात नवी मुंबई -10, ठाणे-6, नाशिक -2, औरंगाबाद-2, पुणे- 17, सोलापूर- 2, नागपूर -6, कोल्हापूर-2, अमरावती-2 अशा चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे.

पॉवर अप अ‍ॅप

इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, चार्जिंग स्टेशनची सद्यस्थिती तसेच भौगोलिक निर्देशांकाची माहिती प्रदान करण्यासाठी महावितरणने पॉवर अप नावाचे मोबाईल अ‍ॅप विकसीत केलेले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची सद्यस्थिती (उपलब्ध किंवा वापरात आहे), स्टेशन वर्णन, प्लग टाईप, शक्ती (डीसी, एसी). सुरु करण्याची वेळ, उपलब्ध वेळ (अँपद्वारे बुकिंग). सद्यस्थळापासूनचे अंतर चालू स्थळावरुन जवळचे स्टेशन सर्व्हिसमध्ये नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास जवळचे पर्यायी चार्जिंग स्टेशन इत्यादी माहिती उपलब्ध आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com