उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यास पुढाकार घेणार-श्रीमती तडवी

आयमात आयोजित बैठकीत अभ्यासक्रम निर्मितीवरही भर
उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यास पुढाकार घेणार-श्रीमती तडवी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशकातील (nashik) औद्योगिक क्षेत्रांत (Industrial Sector) उद्योजकांना आवश्यक असलेला कुशल कामगार उपलब्ध करून देण्यासाठी

तसेच त्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम विविध शैक्षणिक संस्थांकडून (Educational institutions) तयार करून घेण्यास आपण पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास (District Skill Development) आणि उद्योजक मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त ए.एल. तडवी (Assistant Commissioner of Entrepreneurs Guidance Center A.L. Tadvi) यांनी केले.

नाशकातील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, कुशल कामगारांचा असलेला तुटवडा आणि कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी सर्टिफिकेट अभ्यासक्रम राबविणे यासाठी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (AMBAD INDUSTRIES AND MANUFACTURERS ASSOCIATION) पुढाकाराने आयमाच्या सभागृहात विविध अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विषयक महाविद्यालयांचे (Engineering and Management Colleges) प्राचार्य आणि त्याच्याशी निगडित संस्थांच्या मान्यवरांची बैठक आयोजिण्यात आली होती.

त्यावेळी मार्गदर्शन करतांना श्रीमती तडवी बोलत होत्या. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ (AIMA President Nikhil Panchal), सरचिटणीस ललित बूब, उद्योग व संस्था संवाद समितीचे चेअरमन जगदीश पाटील, उपाध्यक्ष राजेन्द्र पानसरे, सहसचिव गोविंद झा, हर्षद बेळे, कुंदन डरंगे, जयंत पगार आदी होते. औद्योगिक संस्था, महाविद्यालये व संस्थांद्वारे कर्मचारी व कामगारांचे ज्ञान मूल्यमापन करणे,

उद्योगातील प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटीवर (practical activity) आधारित अभ्यासक्रम तयार करणे, कर्मचारी व कामगारांमध्ये कौशल्य संपादनाबाबत जागरूकता निर्माण करणे, कर्मचारी व कामगारांसाठी कौशल्य विकासावर (skill development) भर देणे, ज्यांचे शिक्षण (education) दहावी अथवा बारावीपेक्षा कमी आहे अशा कर्मचारी व कामगारांसाठी डिप्लोमा (Diploma) आणि पदवी अभ्यासक्रम तयार करणे, कर्मचारी व कामगारांना सैद्धांतिक शिक्षणासाठी पायाभूत सुविधा प्रदान करणे, सध्याच्या उद्योगाच्या मागण्या आणि ट्रेंडवर आधारित अभ्यासक्रमाची रचना करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.

चर्चेत आयमाचे पदाधिकारी तसेच विविध तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य नीळकंठ निकम, श्रीहरी उपासनी,प्रकाश कडवे,पंकज धर्माधिकारी, इंद्रजित सोनवणे,विक्रम शेट्टी, विक्रम बालाजीवाले, सायली काकडे,व्ही.एस.पाटील,गौरव धारकर, व्ही.एस.ओहोळ,मधुकर दुबे, एस.के.पांडे आदींनी सहभाग घेतला.

उद्योगांना पूरक असा अभ्यासक्रम निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन या सर्वांनी दिले.आयमा अध्यक्ष निखील पांचाळ यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करून उद्योगांना आवश्यक असलेला मनुष्यबळ कसा हवा हे स्पष्ट केले.आयमाच्या पुढाकाराने सुरू असलेल्या निर्यात व्यवस्थापक अभ्यासक्रमास मिळत असलेल्या प्रतिसादाची माहितीही त्यांनी विशद केली.ललित बूब यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com