अंजूम कांदेंना मिसेस इंडिया वर्ल्ड पुरस्कार

अंजूम कांदेंना मिसेस इंडिया वर्ल्ड पुरस्कार

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

देशाच्या फॅशन (Fashion) जगतातील यंदाचा सर्वोत्तम सौंदर्य पुरस्काराचा (Beauty Prize) बहुमान आ. सुहास कांदे (mla suhas kande) यांच्या पत्नी अंजुम कांदे (Anjum Kande) यांना दिल्लीत (Delhi) झालेल्या एका सभारंभात बहाल करण्यात आला.

पॉरसा कम्युनिकेशन (Porsa Communication) आयोजित डिजेल्स इव्हेन्ट मिस (Diesels Event Miss) व मिसेस सौंदर्यवती स्पर्धेत नुकतेच दिल्ली येथे झालेल्या ग्रॅण्ड फिनालेत (Grand Finale) देशभरातील विविध स्पर्धकांमध्ये मिसेस इंडिया वर्ल्ड पुरस्काराने अंजूम कांदे यांना गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा या राज्यातून प्रत्येकी तीन स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सामाजिक उपक्रम, सामान्यज्ञान, सांस्कृतिक योजना, व्यक्तिमत्व विकास या निकषांवर अंजूम कांदे यांनी उत्तम गुण मिळवत किताब मिळवला.

आपली बौद्धिक क्षमता (Intellectual capacity), सामाजिक कार्य (Social work) आणि भविष्यातील समाजहिताच्या विविध योजना व अतिशय आशावादी व्यक्तिमत्वाच्या जोरावर त्यांनी अंतिमफेरीत यशाचे शिखर गाठले. उच्चशिक्षित अंजुम कांदे या सतत समाजसेवेत कार्यरत आहेत. नांदगाव विधानसभा मतदार संघातील (Nandgaon Assembly constituency) युवती व महिलांच्या उत्कर्षासाठी त्या विविध उपक्रम राबवतात. देवाज हेल्थ अ‍ॅण्ड फाउंडेशन तसेच समता ब्लड बँकेच्या माध्यमातून आरोग्यसेवेतही त्यांचे मोठे योगदान आहे. एक उत्तम गृहिणी, माता, यशस्वी व्यवसायिक तसेच सेवाभावी समाजसेविका अशा विविध भूमिका त्या जबाबदारपणे सांभाळतात. नव्या युगाची प्रेरणा घेत सौंदर्य स्पर्धेत भाग घेत त्यांनी स्वतःला सिद्ध केले, ही उल्लेखनीय बाब आहे.

सौंदर्य स्पर्धेसारख्या नवीन क्षेत्रात भाग घेतांना त्यांनी आपल्या संस्कृतीचे भान ठेवत मराठमोळी नऊवारी साडी परिधान करुन स्पर्धेत भाग घेतला. आपल्या मतदार संघातील महिला व युवतींना आपली संस्कृती, संस्कार, घरसंसार सांभाळत नव्या युगातही स्त्री आपले कर्तृत्व सिद्ध करु शकते. क्षेत्र कोणतेही असो स्त्री ते आवाहन स्विकारण्याची क्षमता ठेवते, ही प्रेरणा त्यांनी दिली आहे. या यशानंतर जुलै महिन्यात साऊथ कोरियात होणार्‍या मिसेस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याचा मान अंंजुम कांदे यांना मिळाला आहे. त्याबद्दल संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून सोशल मीडियावर अंजुम कांदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Stories

No stories found.