मानसी बिरारी-जाधव 'मिसेस इंडिया इंटरनॅशनल - 2022' च्या मानकरी

मानसी बिरारी-जाधव 'मिसेस इंडिया इंटरनॅशनल  - 2022' च्या मानकरी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आखाती देशातील दुबई( UAE ) येथे झालेल्या 'मिसेस इंडिया इंटरनॅशनल वर्ल्ड 2022' (Mrs. India International World 2022)या स्पर्धेत नाशिकच्या मानसी बिरारी- जाधव ( Mansi Birari-Jadhav, Nashik) यांनी प्रथम क्रमांकाचा मानाचा मुकुट पटकावला.

या स्पर्धेसाठी प्रथम दिवा मिसेस वेस्ट इंडिया एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया या नावाने प्रथम स्पर्धा पुणे येथे पार पडली होती. या स्पर्धेत मिसेस वेस्ट इंडिया कॅटवॉक आणि मिसेस वेस्ट इंडिया बेस्ट ड्रेस म्हणून पारितोषिक मिळवल्यानंतर 15 जूनला मिसेस इंडिया इंटरनॅशनल या स्पर्धेसाठी मानसी बिरारी जाधव दुबईला रवाना झाल्या होत्या.

दुबईमधील अजमान पॅलेस येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत मिसेस इंडिया इंटरनॅशनल वर्ल्ड 2022 हा पहिला मानाचा मुकुट त्यांनी पटकावला.तसेच मिसेस इंडिया इंटरनॅशनल कॉन्फिडन्टचा सॅश यावेळी मानसी यांना मिळाला.

दुबई येथील महाराणी मोना अल मन्सुरी यांच्या हस्ते हा मुकुट प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल ज्युरींकडून या स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. यासाठी मानसी बिरारी यांना पती अक्षय जाधव, स्वराली मुळे, स्वराली देवलीकर यांच्यासह देवानंद बिरारी, वंदना बिरारी, अमोल जाधव, संगीता जाधव या कुटुंबातील सदस्यांकडूनही प्रोत्साहन मिळाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com