एमपीएससी
एमपीएससी
नाशिक

एमपीएससी, यूपीएससी प्रशिक्षणही ‘ऑनलाइन’

‘बार्टी’ चा पुढाकार

Bharat Pagare

नाशिक | Nashik

करोनाच्या प्रादुर्भावामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) सुरू असलेले प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बार्टीने पुढाकार घेऊन केवळ अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे.

बार्टीमार्फत सुरू असलेले एमपीएससी, यूपीएससी आणि आयबीपीएससह सर्व प्रशिक्षण वर्ग बंद आहेत. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनापासून वंचित आहेत. लॉकडाऊनच्या काळात गावी अडकलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत आहे. ऑनलाईन पद्धतीने व्यावसायिक प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षण शुल्क भरण्यासाठी उमेदवारांकडे पैसे नाहीत. या पार्श्वभूमीवर बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय घेतला. या प्रशिक्षणाची सुरुवात २४ जुलैपासून झाली आहे.

वेबिनार तसेच यु ट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील दीड लाखांपेक्षा जास्त उमेदवार प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. बार्टीच्या प्रशिक्षणात प्रशिक्षक तज्ज्ञ आणि अधिकारी विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल यासह विविध विषयांवर मोफत मार्गदर्शन करीत आहेत. प्रशिक्षण दररोज सकाळी ८ ते १२ यावेळेत 'बार्टी ऑनलाइन एमपीएससी'वर होत आहे.

पुढील काही दिवसांत यूपीएससी आणि आयबीपीएसचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरु होणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आँनलाईन नाेंदणी करावी लागेल, अशी माहिती बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com