एमपीएससी परीक्षा
एमपीएससी परीक्षा
नाशिक

एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा

१९ ऑगस्ट बदलता येईल केंद्र

Bharat Pagare

नाशिक | Nashik

राज्य लाेकसेवा आयाेगाकडून २० सप्टेंबर राेजी हाेणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी पुणे जिल्हा निवड केलेल्या उमेदवारांना त्यांच्या महसूली ठिकाणी परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. १७ ऑगस्टच्या दुपारी दोन वाजल्यापासून १९ ऑगस्टच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत उमेदवारांना केंद्र बदलता येणार आहेत

पुणे जिल्हा निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे महसूली विभागा बाहेरील मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या उमेदवारांना त्यांच्या महसूली विभागातील परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. तर पुणे महसूली विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यास मुभा असणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान महसूली परीक्षा केंद्र बदलण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना आयोगामार्फत एसएमएस पाठविले जाणार आहेत.

खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवार, दुर्गम भागातील उमेदवारांना सध्याच्या परिस्थितीमध्ये अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेकरिता उपस्थित राहण्यासाठी उदभवणा-या अडचणी, लाॅकडाउनच्या पू्र्वी पुणे शहरात आयोगाच्या विविध परीक्षांकरीता मोठया संख्येने पुणे महसुली विभागाबाहेरील उमेदवार अभ्यासाकरीता वास्तव्य करीत होते. कराेना विषाणुच्या प्रार्दुभावामुळे ते आता त्यांच्या मूळ गावी गेले आहेत, ही बाब, सध्याचे प्रवासावरचे व तात्पुरत्या वास्तव्यावरील निर्बंध लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रत्येक महसूल विभागाच्या मुख्यालयातील जिल्हा केंद्राची कमाल क्षमता लक्षात घेवून ‘प्रथम येणा-वास प्राधान्य’ या तत्वानुसार केंद्र निवडण्याची मुभा असेल, केंद्राची कमाल क्षमता संपुष्टात आल्यानंतर त्या केंद्राची निवड उमेदवारांना करता येणार नाही.

राज्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा २० सप्टेंबर २०२० रोजी देणार आहेत. परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर येणे उमेदवारांना कठीण होणार आहे. ही अडचण लक्षात घेऊन आयोगाने लाेकप्रतिनिधी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनच्या मागणीनुसार परीक्ृा केंद्र बदलण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com