खासदार स्वयंरोजगार कर्ज वितरण उपक्रम स्तुत्य: खासदार श्रीकांत शिंदे

खासदार स्वयंरोजगार कर्ज वितरण उपक्रम स्तुत्य: खासदार श्रीकांत शिंदे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यातील बेरोजगारीवर (Unemployment) मात करण्यासाठी स्वयंरोजगार कर्ज वितरण (Disbursement of Self Employment Loans) मिळावे आयोजित करणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर देखील स्वयंरोजगार कर्ज वितरण मिळावे आयोजित केल्यास आपण निश्चितच बेरोजगारीवर मात करण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. कर्ज वितरण मेळावे आज काळाची गरज असून बँका (banks) आणि शासनाच्या महामंडळांनी सांघिक काम करणे महत्त्वाचे आहे.

गेल्या महिनोमहिने प्रलंबित असलेले स्वयंरोजगारांची हजारो कर्ज प्रकरणे खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी मार्गी लावून मोठे सामाजिक दायित्व निभावले आहेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी गोडसे यांच्याकडून सुरू असलेले उपक्रम स्तुत्य व अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी केले आहे.

खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या तीन महिन्यात विविध बँकांनी दोनशे दहा कोटी रूपयांचे सुमारे तेरा हजार कर्ज प्रकरणे मंजूर केले आहे. लाभार्थींना मंजुरी पत्र आणि धनादेश (check) वितरित करण्यासाठी कालिदास कलामंदिर येथे आयोजित केलेल्या खासदार स्वयंरोजगार कर्ज वितरण महामेळाव्यात बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिपादन केले आहे.

यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Collector Gangatharan D.), नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner of Nashik Municipal Corporation Dr. Chandrakant Pulkundwar), उपायुक्त करूणा डहाळे, शिवसेनेचे प्रदेश सचिन भाऊसाहेब चौधरी, संपर्क प्रमुख जयंत साठे, संजय बच्छाव, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ तसेच सी.बी.सिंग, आर.आर.पाटील, अशोककुमार भालोटिया, चंद्रशेखर अलवा, विकासकुमार, अनुराग सिंग, सुनील बोरा, के.महापात्रा, सुमेर सिंग, अलोककुमार, सुरेश पालवे आदि विविध बँकेच्या अधिकाऱ्यांसह महामंडळांचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

महामंडळाकडून जाणारे कर्ज प्रकरणे बँका मंजूर करत नाहीत या गंभीर बाबीची दखल घेत खा.गोडसे यांनी तीन महिन्यापासून विशेष प्रयत्न सुरु केले होते. खासदार गोडसे यांनी स्वतः विविध बँकांच्या कार्यालयात जात प्रशासनासोबत मिटिंग घेतल्या होत्या. यातूनच विविध बँकांनी तेरा हजार कर्ज प्रकरणे मंजुर केले होते. आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात दोनशे लाभार्थींना कर्ज मंजुरी पत्र, धनादेशाचे वितरण करण्यात आले.

बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासनाकडूू लवकरच राज्यात ७५ हजार बेरोजगारांना नोकरी देणार असून पाच लाख स्वयंरोजगारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात तीन हजार ठिकाणी मेळावे घेण्यात येणार आहे.या बरोबरच तीस हजार शिक्षकांचीही लवकरच भरती करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

गेल्या सहा महिन्यात शासनाने साडेतीन हजार रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नऊ कोटी रुपयांची वाटप केले असून माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेअंतर्गत चार कोटी महिलांची तपासणी केली आहे.अठरा वर्षापर्यंतच्या मुला -मुलींना आपला दवाखाना संकल्पनेतूून बाळ सुरक्षा अभियाना अंतर्गत राज्यभर विनामूल्य आरोग्य सेवा देण्याचा मानस यावेळी खासदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक जाणिवेतून खासदार गोडसे यांनी स्वयंरोजगारांना कर्ज पुरवठा होण्यासाठी केलेले कार्य अभिनंदन आणि अतुलनीय असल्याचे प्रतिपादन खा.श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.लाभार्थींच्या गर्दीने महाकवी कालिदास कलामंदिर खचाखच भरलेले पाहून खा.शिंदे यांनी महामेळाव्याचे आयोजक खा.गोडसे यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खा. गोडसे यांच्या असंख्य विश्वासू सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com