खा.गोडसेंची लष्करी अधिकार्‍यांशी भेट

खा.गोडसेंची लष्करी अधिकार्‍यांशी भेट

दे. कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

विजयनगर भागातील रस्ते ऑक्टोबरअखेर बंद केले जाणार आहे.

विजयनगर, गांधीनगर, गंभीर वाडी येथील नागरिकांच्या जीवन मरणाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लष्करी अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन खा.हेमंत गोडसे यांनी ब्रिगे. जे.एस. गोराया यांच्या भेटी दरम्यान केले.

खा गोडसे, महापौर सतिष कुलकर्णी, कॅन्टोन्मेंट उपाध्यक्ष सचिन ठाकरे, माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, योगेश मस्के, इगतपुरी प.स. सदस्य नामदेव गाढवे, सुनील गाढवे यांनीे ब्रिगे. गोराया यांची भेट घेतली. यावेळी विजयनगर भागातील रस्ते ऑक्टोबरअखेर बंद केले जाणार असल्याने येथील रहिवासी चिंतेत आहेत.

याबाबत खा.गोडसे यांनी देशहितासाठी शेतकर्‍यांनी आपल्या काही जमिनी दिल्या. राहिलेल्या जमिनी कसणे अथवा विकसित करणे यासाठी रस्ताच उपलब्ध नसला तर शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. शिवाय 300 एकर क्षेत्र रस्त्याविना पडून राहू शकते आदी बाबी निदर्शनास आणून दिल्या.

मनपा हद्दीतील गांधीनगर येथील लष्करी एरोड्रमवर सध्या हेलिकॉप्टरचे प्रशिक्षण घेताना होणारा आवाज हा लगतच्या नागरी वस्तीतील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.

याबाबत महापौर कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित केला असता लष्करी ताफ्यात नवीन नवीन साधन सामग्रीचा समावेश होत असून यापुढे अधिक आवाजाचे हेलिकॉप्टरसुद्धा येऊ शकतात. त्यामुळे याबाबत वरिष्ठ कार्यालय निर्णय घेऊ शकते, असे सांगण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील गंभीर वाडी परिसरात लष्कराने सराव सुरू केल्याने या भागातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याशिवाय तरहाळे बेलगाव, धामणगाव, अस्वली स्टेशन, नांदूर वैद्य हा भागही लष्कराच्या रडारवर आहे.

याबाबत खा.गोडसे यांनी ही गावे आदिवासी भागातील असल्याने कायद्यानुसार ग्रामपंचायतीच्या संमतीशिवाय ताब्यात घेता येणार नाही. लष्करी आस्थापनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले. कॅन्टोन्मेंटने पारित केले बांधकाम आराखडे, विजयनगर भागात विविध सोसायंट्यांचे संबंधित रस्ते गृहीत धरून बांधकाम आराखडे मंजूर केले आहे. शेकडो लोक येथे राहतात. शेळके कॉम्प्लेक्स ते अर्क सोसायटी हा पर्यायी रस्ता मंजूर केल्यास समस्या मार्गी लागतील, असे सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com