
घोटी | प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणात स्थानिक शेतकऱ्यांच्या जागा संपदीत झाल्या आहेत मात्र विनावापरत असलेल्या जागा शेतकऱ्यांना परत मिळून देणार असून सर्व शिवसैनिकांनी पक्ष संघटन वाढीसाठी सर्वांनी गावागावत शासकीय योजना पोहचविण्याचे काम युवाकांनी करावे.
यासोबतच केंद्रात राज्यात मोदी सरकार चांगले काम करत असून देशात राम मंदिर उभे करण्याचे काम सुरु असून राज्यात मुख्यमंत्री देखील चांगल काम करत आहे. राज्यात मुख्यमंत्री चांगले काम करत असून त्यांचे काम सर्व साधारण जनते पर्यंत देण्याचे काम शिवसैनिकांनी करावे असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.
इगतपुरी तालुका शिवसेनेचा घोटी खंबाळे येथे मेळावा संपन्न झाला त्याप्रसंगी बोलत होते तालुक्यात पक्ष संघटन वाढविण्यासाठी तालुक्यातील सर्व शाखा प्रमुख व गटप्रमुख यांना खासदार हेमंत गोडसे यांनी नियुक्ती पत्र दिले असून पक्ष संघटन वाढीसाठी ताकदीने कामे करावे असे आव्हान खासदार गोडसे यांनी केले आहे.
माजी आमदर काशिनाथ मेंगाळ यांनी मनोगत व्यक्त केले. इगतपुरी तालुक्यातील पाच हि गटात यावेळी शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून माजी आमदर काशिनाथ मेंगाळ व तालुकाप्रमुख संपत काळे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते.
तसेच यावेळी ९९ शाखा प्रमुखची नियुक्ती करण्यात आली आणि गाव तिथे शाखा उदघाट्न करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख जयंत साठे, सह संपर्कप्रमुख माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, लोकसभा संपर्कप्रमुख गणेश कदम,माजी जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, तालुकाप्रमुख संपत काळे, माजी आमदार पांडुरंग गांगड,जिल्हा संपर्क प्रमुख योगेश म्हसने,महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूजाताई धुमाळ, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सिंघानिया ताई उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, युवा सेना जिल्हा प्रमुख सदानंद नवले हे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख अनिल ढिकले,तालुका प्रमुख संपत काळे.
यावेळी कार्यक्रमासाठी इगतपुरी विधानसभा संपर्क प्रमुख कुंडलिक जमदाडे, वकील सेना तालुकाप्रमुख मारुती आघान, कैलास भगत, संजय लोते, तालुका संघटक जयराम गव्हाणे, संदीप शिरसाट, युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर जमदाडे, ज्ञानेश्वर भटाटे, विश्वास खातळे, प्रसिद्धी प्रमुख विलास बोराडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.