भुजबळ फार्म
भुजबळ फार्म
नाशिक

ये रिश्ता क्या कहलाता है! मैत्री दिनाला खा.गोडसेंनी चढली भुजबळ फार्मची पायरी

वाढदिवशी घेतली भेट

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । कुंदन राजपूत

राजकारणात काहिही होऊ शकते असे म्हणतात. ते पुन्हा एकदा भुजबळ फार्मवर पहायला मिळाले. वाढ दिवसाच्या पूर्व संध्येला शिवसेना खा.हेमंत गोडसे यांनी भुजबळ फार्मची पायरी चढली. त्यांनी भुजबळांचे आशीर्वाद घेतल्याचे कळते.

एवढेच नव्हे तर छगन भुजबळ, माजी खा.समीर भुजबळ व खा.गोडसे हे तिन्ही एकाच गाडीतून बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. या तिन्ही नेत्यांना एकत्र पहायल्यावर काहींना दे धक्का बसला. तसेच या भेटी गाठिला फ्रेंडशिप डे चा दुग्ध शर्करा योग जुळून आला. त्यामुळे 'ये रिश्ता क्या कहलाता है' अशी खमंग चर्चा यावेळी रंगली होती.

खा.गोडसे यांच्या निधीतून जिल्हा रुग्णालयात करोना टेस्टिंग लॅब उभारली जात आहे. त्याची माहिती देण्यासाठी खा.गोडसे भुजबळ फार्मवर गेल्याचे कळते. तर विशेष म्हणजे खा.गोडसेंचा आज वाढदिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी भुजबळ फार्मची पायरी चढावी हा निव्वळ योगायोग समजावा.

यापुर्वी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ते नेहमी बाबा बर्फानीचे दर्शन घ्यायला अमरनाथला जातात. पण यंदा करोनामुळे त्यांची अमरनाथची वारी हुकली व त्यांनी मोठया भुजबळांचे दर्शन घेतले. तिथे माजी खासदार व कधीकाळचे कट्टर विरोधक समीर भुजबळपण होते. तिथला पाहुणचार घेतल्यानंतर खा.गोडसे भुजबळांच्या गाडीतुनच जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकिसाठी पोहचले.

सिनियर भुजबळ फ्रंट सिटवर होते. तर दोन्ही आजी माजी खासदार मागील सीटवर हास्य विनोदात रमले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच गाडीतून उतरल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला पण हा भुवया उंचावल्या नाही. कारण राज्यात सध्या महाविकास आघाडीची सत्ता असून तिन्ही पक्षात सौहार्दाचे वातावरण आहे. तोच पिक्चर या भेटीतून पहायला मिळाला.

खा.गोडसे यांनी या अगोदर भुजबळ काका पुतण्याच्या जोडीला लोकसभेच्या आखाडयात आस्मान दाखवले आहे. निवडणुकीत यांनी ऐकमेकांचे वस्त्रहरण केले होते. त्यामुळे गोडसेंनी भुजबळ फार्मची पायरी चढणे व एकाच गाडीतुन प्रवास यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पिक्चरच्या आठवणी ताज्या झाल्या नसत्या तर नवलच.

भुजबळ फार्मवर गोडसेंनी भुजबळांच्या पाया पडून वाढदिवसाचा आशीर्वाद घेतल्याचे समजते. पण गोडसेंनी नाशिक लोकसभेतून हॅट्ट्रिक मारावी हा आशीर्वाद भुजबळांनी दिला का नाही हे मात्र कळु शकले नाही. मात्र फ्रेंडशिप डे च्या दिवशी या रंगतदार घडामोडीची जोरदार चर्चा रंगली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com