खा. पवारांनी घेतला व्ही.सी.द्वारे आढावा
नाशिक

खा. पवारांनी घेतला व्ही.सी.द्वारे आढावा

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतेच दिंडोरी व सुरगाणा या तालुक्यात सर्पदंशाने दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची दखल घेत खासदार डॉ.भारती पवार यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोडे यांना पत्र दिले. त्यावर त्यांनी तातडीने सर्वच तालुका आरोग्य अधिकार्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित केली.

व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये खा.डॉ. भारती पवारांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात काय काय सुविधा आहेत, पुरेसा औषध साठा आहे की नाही, सर्पदंश लस उपलब्ध आहे की नाही. रुग्णालयात सर्व डॉक्टर्स, परिचारिका, फार्मासिस्ट, उपस्थित असतात का? याची सविस्तर माहिती घेतली. ह्या सर्व सुविधा रुग्णांना व्यवस्थीत मिळाव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे पत्राद्वारे केली.

काही तालुक्यातील आरोग्य केंद्रावर सर्पदंश बाधित रूग्णांना व इतर आजारांवर उपचार घेणार्‍या रुग्णांना उपचार न करताच तालुक्यातील ग्रामिण रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितले जाते. त्यामुळे बाधित रुग्णांना त्वरित उपचार मिळत नाही. अशा घटना घडु नये याकरीता जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंश वरील लस व इतरही आरोग्याच्या उपचारसोई उपलब्ध करून सदर प्रकरणी संबंधीतांना आदेश देण्यात यावेत अशा सूचना खासदार डॉ.भारती पवार यांनी अधिकार्‍यांना केल्या.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लिना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी अधिकारी, कपिल आहेर, डॉ.चौधरी, डॉ. महाले आणि सर्व तालुक्यातील टी एम ओ आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com