खा. डॉ. भारती पवार यांना मंत्रीपद मिळाल्याने जल्लोष

दै. देशदूतचे वृत्त ठरले खरे
खा. डॉ. भारती पवार यांना मंत्रीपद मिळाल्याने जल्लोष

दिंडोरीे । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील( Dindori Lok Sabha constituency ) खासदार डॉ. भारती पवार ( MP. Dr. Bharti Pawar )यांची केंद्रीय मंत्रिमंडळात ( Cabinet Minister ) समावेश झाल्यानंतर दिंडोरी तालुक्यासह सर्व मतदार संघात आनंदाचे वातावरण पसरले होते. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त करून जल्लोष केला.

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. डॉ. भारती पवार यांना अनेकांनी दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. गेल्या दोन दिवसांपासून येणार्‍या बातम्यांमध्ये कुठेही डॉ. भारती पवार यांचे नाव नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.

वर्तमानपत्रात आणि दूरचित्रवाहिनीवर डॉ. पवार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचे वृत्त प्रसिध्द होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले. कार्यकर्त्यांनी एकमेंकाना शुभेच्छा दिल्या. सर्व कार्यकर्ते बातम्याची खातरजमा करत होते. अनेक कार्यकर्ते या वृत्ताने हेलावून गेले. दिंडोरी तालुक्यात सर्व प्रथम माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी वृंदावन मंगल कार्यालयात विजयी मेळावा घेऊन डॉ. भारती पवार यांना दिंडोरी-पेठ तालुक्यातून पाठिंबा जाहीर केला होता. तत्कालिन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात रामदास चारोस्कर यांनी डॉ. भारती पवार यांच्या विजयाची दिशा निश्चित केली होती.

दै. देशदूतचे वृत्त ठरले खरे

केंद्रीयमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या नावाची चर्चा हा अंदाज दैनिक देशदूतने अगोदरच व्यक्त केला होता. केंद्रात. डॉ. पवार यांना मंत्रीपद मिळाल्याने देशदूतचे वृत्त खरे ठरले.

नाशिक विभागात आठ पैकी सहा खासदार भाजपाचे आहे. राज्यात 48 खासदार आहे. असे असुनही मोदी सरकारमध्ये उत्तर महाराष्ट्राला मंत्रीपद नव्हते. सत्तेचा अनुशेष भरून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नाशिकला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिल्याने नाशिक जिल्ह्याला न्याय दिला आहे. डॉ. भारती पवार यांचा राजकीय वलयामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने उमराणे गटातून जि. प. सदस्य पद भूषविले. त्यानंंतर त्यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्याक्षपदी निवड करण्यात आली होती. 2014 मध्ये राष्ट्रवादीकडून दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी त्यांना मिळाली.

पंरतू त्यांचा भाजपाचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पराभव केला. 2019 मध्ये दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपामध्ये प्रवेश करून सर्वाना आश्चर्चाचा धक्का दिला होता. त्यांना दिंडोरी लोकसभेचे तिकीट मिळाल्याने त्यांनी पक्षााचा विश्वास सार्थ ठरवीत. त्यांना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले. उत्तर महाराष्ट्राच्या प्रवक्त्या म्हणून सुद्धा त्यांची पक्षानीनियुक्ती केली. खासदार झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या प्रश्नांची दखल घेऊन त्यांनी कळवण, दिंडोरी, निफाड , देवळा, वणी येथे पणन मंडळाचे खरेदी केंद्राचे उद्घाटन केले. कांदा प्रश्न त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून मार्गी लावला. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने मोदी सरकाराने जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला न्याय दिला आहे.

कामकाजाचा उत्तम अनुभव

खा.डॉ. भारती पवार यांनी दिंडोरी मतदार संघात निवडून आल्यानंतर प्राधान्याने शेतकर्‍यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. भविष्यामध्ये पवारताई कुठेतरी मतदारसंघाचे नाव उज्ज्वल करतील, या अपेक्षेनेच तत्कालिन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन आपण निवडणुकीत पाठिंबा दिला होता. आपल्या स्वभावाने मतदारांची मने जिंकली. आदिवासी समाजातून त्यांचे नेतृत्व पुढे आले. त्यांना मोदी सरकारने संधी दिली. कांदा प्रश्नी त्यांनी अनेक वेळा आवाज उठविला. त्या जि. प. सदस्या असताना त्यांचे कामकाज पाहिले आहे. यापुढे मंत्रीपद मिळाल्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या हातातून मोठी जनसेवा घडेल, यात शंका नाही.

रामदास चारोस्कर, माजी आमदार

विकासकामे गती घेणार

दिंडोरी लोकसभा मतदार संपूर्ण मतदार संघाची माहिती असलेले आणि घराच राजकारणचे बाळकडू मिळालेले असल्याने त्यांच्या मंत्रीपदाच्या रूपाने मतदार संघात विकासकामे अधिक गतीने होतील.एका सुशिक्षित महिलेला केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने ही मतदार संंघातील नागरिकांसाठी अभिमानास्पद बाब आहे.

- सुवर्णा जगताप, सभापती लासलगाव बाजार समिती.

मोठे प्रकल्प दिंडोरीत येण्याचा मार्ग मोकळा

खा.डॉ. भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने खर्‍या अर्थाने दिंडोरी लोकसभा मतदार संघाला न्याय मिळाला. दिंडोरी शहरात विकासकामांना यापूर्वी सहकार्य केलेले आहे. आता दिंडोरीत विकासाचे नवे पर्व येईल. सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सांभाळणार्‍या खा.मंत्री झाल्याचा आनंद आम्हाला झाला असून त्यांच्या काळात अनेक मोठे प्रकल्प येतील.

नितीन धिंदळे, सामाजिक कार्यकर्ते, दिंडोरी

केंद्राचा निधी येणार

दिंडोरी शहरात केंद्र सरकारचा निधी येण्याचा मार्ग मोकळा झाला असून खा.डॉ. भारती पवार दिंडोरी शहरात नक्कीच नवनवीन प्रकल्प आणतील.

नीलेश शिंदे, शिवाजीनगर, दिंडोरी

कामाची दखल

आदिवासी समाज व शेतकरी यांचे प्रश्न संसदेत प्रखरपणे मांडले. दिंडोरी मतदार संघाच्या शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर त्या धावून आल्या. शेतकर्‍यांना, गरीबांना दिलासा दिला. त्यामुळेच त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली.

प्रमोद देशमुख, गटनेते नगरपंचायत, दिंडोरी

कार्यकर्त्यांना सांभाळणारे खासदार

खा.डॉ. भारती पवार ह्या आदिवासी कुटूंबातून आलेल्या व्यक्तीला मंत्रीपद देवून नरेंद्र मोदी यांनी जनतेलाच मंत्रीपद दिले आहे. भाजपच्या माध्यमातून काम करताना त्यांनी सामान्य जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे हित जोपासले आहे. .

नरेंद्र जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष, दिंडोरी

दिंडोरीतील विकासकामांना गती येणार

उच्च शिक्षित लोकप्रतिनिधी मंत्रीरुपात मतदारसंघाला मिळाल्याने निश्चित त्याचा फायदा पुढील काळात होणार आहे. दिंडोरी शहरात रखडलेल्या विकासकामांना डॉ. भारती पवार यांच्यामुळे गती येणार असून अनेक मोठे प्रकल्प दिंडोरी परिसरात येतील.

रणजित देशमुख, सामाजिक कार्यकर्ते,

जनतेची अपेक्षा पूर्ण होईल

दिंडोरी मतदारसंघाला डॉ. भारती पवार यांच्या रुपाने केंद्र स्तरावर संधी मिळाली आहे. दिंडोरी शहरातील जनतेला त्यामुळे आनंद झाला असून जनतेची अपेक्षा मोदींनी पूर्ण केली आहे.

शाम मुरकूटे, भाजप शहराध्यक्ष, दिंडोरी

पंतप्रधान मोदींनी जनतेचा आवाज ओळखला

नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या मनातील आवाज ओळखला असून मोदींची अपेक्षा डॉ. भारती पवार नक्कीच पूर्ण करतील. दिंडोरीसह राज्याला पवार यांचे नेतृत्व लाभेल.

विलास देशमुख, दिंडोरी

शेतकरी नेत्या

खा.डॉ. भारती पवार सुरत महामार्ग, बेरोजगारींचे प्रश्न, द्राक्ष, कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवतील, यात शंका नाही.

चंद्रकांत राजे, ज्येष्ठ नेते भाजप

आरपीआयकडून स्वागत

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी ए.टी. पवारांना मानसपुत्र मानले होते. त्यांच्या सुनबाई डॉ. भारती पवार ह्या मंत्री झाल्याने आंबेडकरी जनतेला आनंद झालेला आहे.

सागर गायकवाड, ं युवक तालुकाध्यक्ष रिपाइं

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com