
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री बबन घोलप (Baban Gholap) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन नाशकात (Nashik) २१ ते २६ जानेवारी दरम्यान होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) जीवनावर आधारित महानाट्याच्या प्रयोगाची माहिती देत उपस्थित राहण्याचे आवाहन केले...
यावेळी घोलप यांनी खासदार कोल्हे यांचा सत्कार करत नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेबाबत (Nashik-Pune High Speed Rail) चर्चा केली. याशिवाय शेतकऱ्यांच्या (Farmers) अडीअडचणी आणि इतर प्रश्नासंदर्भात चर्चा करून किसान रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.
यावेळी कोल्हे म्हणाले की, नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेबाबत रेल्वे मंत्र्यांशी बोललो असून सदरची चर्चा समाधानकारक झाल्याचे सांगितले. तसेच कोल्हे यांनी नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यास अभिवादन केले. याशिवाय शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत समितीचे कार्य कौतूकास्पद असल्याचे सांगून २१ ते २६ जानेवारी दरम्यान होणाऱ्या महानाट्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान, याप्रसंगी माजी आमदार योगेश घोलप (Former MLA Yogesh Gholap) योगेश गाडेकर, कृष्णा लवटे, नितीन चिडे, नितीन पाटील, विक्रम कोठुळे विक्रांत थोरात, शांताराम घंटे यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.