माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन (movement) केले जाणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षक फेडरेशनचे उपाध्यक्ष आर.डी. निकम यांनी दिली.

नाशिक (Nashik) येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दि. 24 रोजी शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात हे आंदोलन (Movement) छेडले जाणार आहे. 2005 पूर्वी नोकरीस लागलेले व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षकांना (Teeacher) जुनी पेन्शन योजना (Old pension scheme) लागू करण्यात यावी, करोनामुळे (Corona) मृत्यु झालेल्या शिक्षक कर्मचार्‍यांच्या वारसांना तात्काळ अनुकंपा योजनेत नोकरी देण्यात यावी, कोविड योद्धा (Corona warrior) म्हणून काम केलेल्या कर्मचार्‍यांच्या कामाच्या दिवसांची नोंद सेवा पुस्तकात करण्यात यावी,

डीसीपीएस (DCPS) व एनपीएसचा (NPS) हिशेब मिळावा, सातवा वेतन आयोगाचा (Seventh Pay Commission) दुसरा व तिसरा हप्ता तसेच मेडिकल बिले व पुरवणी यासाठी निधी (Fund) मिळावा, संस्थेत वाद असलेल्या ठिकाणी तात्काळ प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी.

यासह विविध मागण्यांसाठी दुपारी 12 ते 4 या वेळेत आंदोलन करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षक, कर्मचारी यांनी सदर आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निकम यांच्यासह जिल्हाध्यक्ष टी.एम. डोंगरे व कार्यवाह चंद्रकांत कुशारे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.