नाशिक । Nashik

महाराष्ट्र शासनाने शिपाई भरती बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनच्यावतीने जिल्हा परिषद वशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

दि. ११ डिसेंबर २०२०रोजी राज्य शासनाने खाजगी अनुदानित शाळामधील शिपाई संवर्गातील पदासाठी नियमित वेतनश्रेणी ऐवजी ठोक मासिक शिपाईभत्ता देण्याचा आदेश काढला आहे.या आदेशाला शिक्षक, शिक्षकेतर वर्ग आणि संघटना यांचा विरोध आहे.हा आदेश विनाविलंब मागे घ्यावा अशी सर्व संघटनांची मागणी आहे.

यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन),शिक्षकेतर संघटना राज्यभरात काळया फिती लावुन काम करण्यात आले. संघटनांच्यावतीने शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. नाशिक यांना (दि.११) डिसेंबर २०२० रोजीचा आदेश रद्द करण्यासंबंधीचे निवेदन नाशिक माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी माननीय अनिल शहारे व कार्यालयीन अधिक्षक सुधीर पगारे यांना देण्यात आले.

या आंदोलनात नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना,नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघटना,नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ,नाशिक जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर लोकशाही आघाडी(टीडीएफ),नाशिक जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना आदी संघटनांनी सहभागी घेतला.