ग्रामीण भागातील बससेवा सुरू न केल्यास आंदोलन

ग्रामीण भागातील बससेवा सुरू न केल्यास आंदोलन

देवळाली कॅम्प | Deolali Camp

करोनाच्या (Corona Crisis) नावाखाली एसटी महामंडळ (ST Corporation) ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करीत नाहीत, त्यामुळे गोरगरीब जनतेला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तरी १ सप्टेंबर पासून बस सेवा सुरू न केल्यास जेष्ठ नागरिक व ग्रामविकास मंच च्या माध्यमातून जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

कोरोना संक्रमण (Corona Crisis) काळात एसटी महामंडळाने (ST Corporation) शहरात बससेवा (City Bus Service) सुरू ठेवली मात्र ग्रामीण भागात आजही बसच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व सामान्य जनतेला शहरात येण्यासाठी अनेक अडचणी होत आहेत. परिणामी खाजगी गाड्या (Private Vehicle) मोठी लुटमार करत आहे.

नाशिक मधून बाहेरील इतर जिल्ह्यात बस सेवा सुरू आहे. मात्र स्थानिक तालुक्यात बस सेवा का नाही असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत. शहरा जवळचे ओझर (Ojhar), मोहाडी, गिरणारे (Girnare), वाडीवर्हे, जातेगाव, नायगाव, पांढूर्ली येथे सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत दर तासाला एक बस उपलब्ध करून दिली तर जनतेची सोय व एसटी ला लाभ होऊ शकतो. तसेच जून्या मुक्कामी बस पुर्ववत सुरू करून जेष्ठ नागरिक विद्यार्थी वर्गाची गैरसोय दुर करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याबाबत एसटी महामंडळ यांनी तातडीने निर्णय घेऊन गैर सोय दूर करावी, अन्यथा ०१ सप्टेंबर पासून

ग्रामविकास मंडळ व जेष्ठ नागरिक मंडळ नाशिक तालुका( Nashik Taluka) यांचे वतीने जनआंदोलन करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com