दिंडोरी राजकीय पडघम: उपनगराध्यक्ष पदासाठी हालचाली गतिमान

दिंडोरी नगरपंचायत
दिंडोरी नगरपंचायत

दिंडोरी । संदिप गुंजाळ | Dindori

दिंडोरी (dindori) नगरपंचायतीचे (nagar panchayat) उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले असुन येत्या 21 सप्टेंबरला नवीन उपनगराध्यक्षांची निवड होणार असल्याचे जाहीर होताच उपनगराध्यक्ष पदासाठी जोरदार मोटबांधणी सुरू झाली आहे. येत्या 21 तारखेला उपनगराध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दिंडोरी नगरपंचायतीचे (Dindori Nagar Panchayat) उपनगराध्यक्ष अविनाश जाधव यांना रोटेशनपध्दतीमुळे राजीनामा (resignation) द्यावा लागला. आता 21 सप्टेंबर रोजी नव्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक (election) जाहिर झाली आहे. पक्षीय बलाबलानुसार शिवसेना (shiv sena) 6, राष्ट्रवादी (Nationalist Congress) 5 , राष्ट्रीय काँग्रेस (Congress) 2 तर भाजप (BJP) 4 असे सदस्य आहेत.

यावेळी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी दोन गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. यावेळी एक सदस्य शिवसेना (shiv seana) गटात तर एक सदस्य राष्ट्रवादीच्या गटात सामील झाले. यावेळी अंतर्गत धुसफूसीमुळे राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊच शकत नाही असा अंदाज लावत भाजपने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी दावा केला होता.

माजी आमदार रामदास चारोस्कर (Former MLA Ramdas Charoskar) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने नगराध्यक्ष पद आपल्याकडेच ठेवण्याचा चंग बांधला. सर्वात जास्त सदस्य संख्या शिवसेनेची असतांना नगराध्यक्ष पदाचा दावेदार आपण असतांना इतर पक्षाचा नगराध्यक्ष कसा बसु शकेल असा सवाल करीत माजी आमदार रामदास चारोस्करांनी भाजपचा (BJP) प्रस्ताव अमान्य केली व चर्चा विस्कटल्याची चर्चा आहे.

त्यानंतर राष्ट्रवादीच्या गटाला सोबत घेऊन शिवसेनेचे नेतृत्व रामदास चारोस्करांनी शिवसेनेच्या मेघा धिंदळे यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान करत वर्चस्व कायम ठेवले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अविनाश जाधव यांच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडली.

यावेळी अविनाश जाधव यांच्या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्मला मवाळ, माधुरी साळुंखे, लता बोरस्ते, दिपक जाधव तर राष्ट्रीय काँग्रेसच्या शैला उफाडे असे एकूण 6 नगरसेवक सहभागी झाले. यावेळी प्रत्येकाला उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. तोच शब्द पाळत उपनगराध्यक्ष अविनाश जाधव यांनी रोटेशन पध्दतीमुळे राजीनामा दिला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे निर्मला मवाळ, माधुरी साळुंखे, लता बोरस्ते, दिपक जाधव यांना संधी मिळणार की राष्ट्रीय काँग्रेसच्या (congress) शैला उफाडे यांनी ऐनवेळी मदत केल्याने त्यांना संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकुणच उपनगराध्यक्ष पद देतांना फोडाफोडीचे राजकारण (politics) होवू नये याची खबरदारी नेतृत्वाकडून घेतली जात असुन चर्चेतुन कोणत्या नगरसेवकाला उपनगराध्यक्ष पदासाठी निवडले जाते यावर सर्वत्र चर्चा चालू आहे. मागील काळात दिंडोरीचे नगरसेवक दिंडोरीच्या विकासनिधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी दिंडोरीचे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याच्या बातम्या राज्यभर चर्चेच्या ठरल्या. यावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिंडोरीच्या नगरसेवकांचा पाठिंबा असल्याबाबतची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली होती.

यावेळी नगरसेवकांनी मात्र सावध भुमिका घेत आम्ही दिंडोरीच्या विकासासाठी विकासनिधी आणण्यासाठी गेलो असुन त्याला सोयीनुसार अर्थ न लावण्याचे आवाहन केले होते. विकासासाठी भाजपला सोबत घ्या असे आवाहन भाजपकडून केले जाण्याची शक्यता देखील नाकारता येवू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटाला देखील सावध भुमिका घ्यावी लागेल हे मात्र नक्की. राजकारण म्हंटले की दिलेला शब्द पाळावा लागतो हे तितकेच महत्त्वाचे. शिवसेनेचे नेतृत्व रामदास चारोस्करांनी आम्हाला शब्द दिल्याने भाजपकडून कोणत्याही पध्दतीने प्रयत्न केले गेले तरीही शिवसेना आम्हालाच पाठिंबा देईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या गटाकडुन व्यक्त केला जात आहे.

असे असले तरीही इच्छुकांमध्ये दिलजमाई करुन एकच नाव समोर येईल की बंडखोरी होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी यावेळी सावध भुमिका घेत नगरसेवक सहलीला घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा येत्या 21 तारखेपर्यंत कोणकोणत्या घडामोडी बघावयास मिळणार ही येणारी वेळच सांगु शकेल. 18 रोजी 50 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

19 ला मतमोजणी झाली की 21 सप्टेंबरला दिंडोरी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. यावेळी कुणाची लॉटरी लागणार? भाजपकडून कोणत्या हालचाली होणार? उपनगराध्यक्ष पदासाठी सत्ताधार्‍यांकडून एकच उमेदवार येईल की बंडखोरी होईल याची सर्वत्र चर्चा सुरू झाली असून पुढे काय घडणार याची उत्कंठा अवघ्या जिल्ह्याला लागलेली आहे.

निवडणूकीची रुपरेषा

बुधवार दि. 21 सप्टेंबर 2022

  • सकाळी 10 ते 12 - नामनिर्देशन अर्ज सादर करणे

  • दुपारी 12 वाजता - नामनिर्देशन पत्राची छाननी (अधिकार्‍याचे नाव - तहसीलदार, दिंडोरी)

  • नामनिर्देशन पत्रा मागे घेणे - छाननीनंतर 15 मिनिटांच्या आत

  • छाननी व माघारीनंतर मागे घेतलेल्या उमेद्वारांची नावे वाचून दाखविले जातील.

  • त्यानंतर लगेच निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याचवेळी निकाल घोषित केला जाईल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com