मातृत्व वंदना योजनेच्या पैशांसाठी आंदोलन

मातृत्व वंदना योजनेच्या पैशांसाठी आंदोलन

सुरगाणा। प्रतिनिधी Surgana

महिलांचे मातृत्व वंदना योजनेचे (Matrutva Vandana Yojana) पैसे मिळण्याबाबत सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) ‘श्रमजीवी’ संघटनेचे (Shramjivi Sanghatna) कार्यकर्ते महिला एकत्र येऊन तालुकाध्यक्ष राजू राऊत यांच्या नेतृत्वाखाली सात तास आंदोलन (Movement) करण्यात आले. आश्वासनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लहान मुलांना घेऊन महिलांचा सात तास प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ठिय्या आंदोलन करुन मातृत्व वंदना योजनेचे पैसे घेतल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर 40,8000 रुपये तत्काळ बँकेत टाकल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सुरगाणा तालुक्यातील शेकडो महिलांना मातृत्व अनुदान योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. म्हणून त्यांना पैसे मिळावे म्हणून बुबळी आरोग्य केंद्रावर श्रमजीवी संघटनेचे आंदोलन चालू आहे. आरोग्य केंद्र कार्यालयाकडून लेखी आश्वासन दिले होते. बुबळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केळुना, थविलपाडा, पिळुकपाडा मातृत्व वंदना योजनेचे पासून वंचित असलेल्या महिलांचे पैसे पंधरा दिवसात जमा होतील, असे लेखी आश्वासन दिले होते.

मात्र पैसे अद्यापही मिळालेले नाही. म्हणून श्रमजीवी संघटनेच्यावतीने आरोग्य केंद्र बुबळी कार्यालयात निवेदनही दिले होते. दोन दिवसांमध्ये पैसे जमा झाले नाहीत तर पुढील काळात श्रमजीवी संघटना आंदोलन करेल. तरी त्याच्यावर काहीही कारवाई न करता असंच फसवत राहिले. म्हणून मातृत्व वंदना योजनेचे पैसे घेण्यासाठी सर्व महिला एकत्र येऊन आंदोलन करण्यात आले आहे.

जोपर्यंत महिलांना पैसे त्यांच्या खात्यावर जमा होत नाही, तोपर्यंत आम्ही आपल्या कार्यलयातुन जाणार नाही, अशी ठाम भूमिका श्रमजीवी संघटनेनी घेतली आहे. संध्याकाळी सर्व अधिकारी येऊन तात्काळ कारवाई केली. मातृत्व वंदना योजना चे पैसे एकूण 121 महिलांच्या खात्यांवर जमा करण्यात आले. यावेळी ‘श्रमजीवी’ संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू राऊत, सचिव दिनेश मिसाळ, उपाध्यक्ष सीताराम सापटे, चंद्रकांत गायकवाड, युवराज गायकवाड, महिला तालुकाप्रमुख मनीषा भोये, सुरेखा गायकवाड, चंद्रकला महाले आदींसह श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com