
जुने नाशिक | Nashik
महासभेने नानावली भागात सर्वधर्मियांसाठी दफनभूमीसाठी जागा दिली आहे. सर्व धर्मांमध्ये मुस्लिम समाजाचे लोक येत नाही का असा प्रश्न उपस्थित करून स्थायी समितीत जो रद्द करण्याचा ठराव करण्यात आला आहे.
तो ठराव रद्द करून मुस्लीम समाजाला न्याय मिळावा, या मागणीसाठी आज महापालिका मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन महापालिका आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी नगरसेविका समिना मेमन, संघटनेचे नेते अजीज पठाण, मुश्ताक शेख, इब्राहिम अत्तार, गुलाम शेख, फय्याज पठाण, अन्वर पिरजादा, रियाज मेमन, मुख्तार शेख, नविद खान, अस्लम खान यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.