महापालिका बससेवा विरोधात आंदोलन

महापालिका बससेवा विरोधात आंदोलन

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

नाशिक महानगरपालिकेच्या परिवहनNMC Bus Services सेवेच्या बसेसने सिन्नर-नाशिक बससेवा sinnar- Nashik NMC Bus Services सुरु करताच परिवहन महामंडळातील MSRTC सेवक जागे झाले असून ही बससेवा आपले भविष्य उध्वस्त करणारी असल्याचे म्हणत एस.टी. कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली एस.टी. च्या सेवकांनी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली व महापालिकेची बससेवा तातडीने बंद करुन एस.टी. ला वाचवा अशी मागणी त्यांनी केली.

संपूर्ण महाराष्ट्रात फक्त राज्य परिवहन महामंडळासच टप्पा वाहतूकीची मंजूरी असतांना महापालिकेला अशी मंजूरी मिळालीच कशी असा सवाल यावेळी विचारण्यात आला. सिन्नर आगाराला सर्वाधिक उप्तन्न नाशिक-सिन्नर बस फेर्‍यांमधूनच मिळते. दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटामूळे बस वाहतूक ठप्पच आहे. चालक-वाहकांचे पगारही करणे अवघड बनले होते. करोनाच्या पार्श्वभुमीवर असणारे निर्बंध शासनाने शिथील केल्यानंतर महामंडळाचे उप्तन्न वाढण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

महामंडळाची गाडी रुळावर येण्याचे चिन्ह दिसू लागले असतानाच अचानक महापालिकेच्या बसेस सिन्नरमध्ये येऊ लागल्याने चालक-वाहकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही अस्वस्थताच बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील घोषणाबाजीतून दिसून आली. ग्रामीण भागात पूरेसे उप्तन्न मिळत नसतानांही एस. टी. बसेस ग्रामीण भागात सेवा पुरवतात. अनेक तोट्यांच्या मार्गावर वेळेत बसेस जाऊन प्रवाशांची ने-आण करतात. नाशिकसारख्या फेर्‍यांमधून तोटा भरुन काढण्यास मदत होते. मात्र, महापालिकेसारख्या संस्था या फषर्‍याही बळकावू लागल्या तर एस. टी. अजून तोट्यात जाणार आहे.

महापालिकेला फक्त त्यांच्या हद्दीतच प्रवाशी वाहतूकीची परवानगी असतांना एस. टी. च्या कार्यक्षेत्रात महापालिकेचा वावर वाढला तर एस. टी. बरोबरच त्यावरील चालक, वाहकांसह अधिकारी सेवकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामूळे महापालिकेला कार्यक्षेत्राबाहेर दिलेली परवानगी रद्द करावी यासह विविध मागण्यांच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. एस. टी. कामगार सेनेचे विभागीय सचीव देवा सांगळे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शाम पोरजे, सचीन सांगळे, सचीन धांगडे, निलेश कर्पे, सोमा पगार, विश्वास गिते यांच्यासह चालक-वाहक सहभागी झाले होते.

सिन्नर आगारात डिझेलचा तुटवडा?

एकीकडे महापालिकेच्या संकटापासून वाचवावे यासाठी चालक-वाहक आंदोलनाचा पवित्रा घेत असतांना सिन्नर आगाराला डिझेलचा तुटवडा भासू लागला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. केवळ पूरेसे डिझेल उपलब्ध न झाल्याने आगारातून सुटणार्‍या लाब पल्ल्याच्या अनेक फेर्‍या मंगळवार (दि.5) पासून रद्द कराव्या लागल्याचे समजते. महापालिकेसारखी स्पर्धक समोर आली असतानांही महामंडळातील वरिष्ठ अधिकारी एस. टी. च्या फेर्‍या सुरळीत करण्यासाठी किती तप्तर आहेत हेही यातून अधोरेखीत होत आहे.

Related Stories

No stories found.