'तो' धोकादायक चेंबर हलवा

'तो' धोकादायक चेंबर हलवा

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

देवळाली (Deolali) येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (Cantonment Board) वॉर्ड क्रमांक 7 मधील शिंगवे बहुला, धोंडीरोड यासह सोनेवाडी या भागात भुयारी गटार योजनेचे (Underground Sewer Scheme) काम करताना गटारीचे चेंबर हे रिपाइं वार्ताफलकासमोर ठेवले आहे.

याठिकाणी महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीसह इतर धार्मिक कार्यक्रम होतात. शिवाय रस्त्या लगत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतो. तरी प्रशासनाने तातडीने चेंबर इतरत्र हलवण्याची मागणी रिपाइं युवानेते सौरभ रिपोर्ट यांच्यासह शहर शाखेने केली आहे.

येथील वॉर्ड सातमधील सोनेवाडी विभाग हा मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. येथे मागासवर्गीयांची वस्ती असल्याने प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असते. इतर सर्व भागात झालेली कामे व येथील कामे यांची तुलना केली असता अजूनही हा भाग मोठ्या प्रमाणावर अविकसित आहे. रस्त्यांची मुख्य समस्या असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.

सर्व आठही वॉर्डात भुयारी गटार योजनेचे काम करताना टाकलेली ड्रेनेजलाईन (Drainage line) व चेंबर अडथळा होणार नाही अशा ठिकाणी टाकलेले आहेत. मात्र सोनेवाडी येथे टाकलेले चेंबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (Republican Party of India) दैनंदिन वार्ताफलका समोरच आहे. त्यामुळे रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना त्याचा त्रास होत असून सदर फलकावर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व लेखन केले जाते.

चेंबरमुळे येथे अस्वच्छता निर्माण होऊन धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्यामुळे कॅन्टोन्मेंट प्रशासनाने (Cantonment Administration) हे चेंबर तातडीने इतरत्र हलवून या ठिकाणी स्वच्छता (Hygiene) करावी, अशी मागणी रिपाई शहराध्यक्ष सुरेश निकम, युवा नेते सौरभ रिपोर्ट यांचेसह इतर कार्यकर्त्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com