धुळीमुळे वाहनचालक त्रस्त

धुळीमुळे वाहनचालक त्रस्त

सिन्नर । वार्ताहर Sinnar

नाशिक-पुणे महामार्गावरील ( Nashik-Pune highway ) गोंदे शिवारात सध्या समृद्धी महामार्गाचे काम ( Samruddhi Express Highway work )प्रगतीपथावर आहे. मात्र, या कामामुळे येथे मोठ्या प्रमाणावर धुळीचे ( dust ) साम्राज्य बघायला मिळत असल्याने दुचाकीधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गोंदे शिवारातून नाशिक-पुणे महामार्गाला ओलांडून समृद्धी महामार्ग जात आहे. समृद्धीच्या उड्डाणपुलामुळे पुणे महामार्ग थोडे वळण देऊन पुढे जोडण्यात आला आहे. मात्र, कच्च्या रस्त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

त्यात समृद्धी महामार्गाच्या कामावरील अवजड वाहनांमुळे व इतर वाहनांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने दुचाकीधारकांना येथून जाणेही जिकिरीचे झाले आहे. त्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने जीव मुठीत घेऊनच दुचाकीचालकांना येथून चालावे लागते.

पाऊस पडल्यावर रत्याला दलदलीचे रुप येत आहे. तर रस्ता कोरडा झाल्यावर धुळीचे साम्राज्य बघायला मिळत आहे. समृद्धीच्या ठेकेदाराने या ठिकाणी पक्का रस्ता करून पुणे महामार्गावरील खड्डे बुजवण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com