दिंडोरी : उमराळे परिसरात चोरांचा सुळसुळाट

दिंडोरी : उमराळे परिसरात चोरांचा सुळसुळाट

उमराळे । Umrale

दिंडोरी तालुक्यातील उमराळे बु. येथे मोटरसायकल चोरीने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

उमराळे बु. येथिल पोपट सावळीराम गायकवाड यांची मोटरसायकल ( एम. एच. 15 डी.आर. 9018) ही मोटरसायकल रात्री रहात्या घरासमोरुन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दिंडोरी पोलीस ठाण्याला दाखल करण्यात आला आहे.

येथील भरत रामचंद्र पाटील ( बोंबले ) हे दिंडोरी येथे हिरो होन्डा फॅगन प्रो ( क्र एम.एच.15 डी. एच. 3806) ही मोटरसायकल दिंडोरी येथिल अ‍ॅक्सेस बॅकसमोर उभी करून बाजार पंटागणात भाजीपाला घेण्यासाठी गेलो होतो.

भाजीपाला खरेदी करून आल्यावर मात्र मोटरसायकल जागेवर नसल्याचे लक्षात येताच दिंडोरी पोलीस ठाण्याला मोटरसायकल हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com